Mapusa Municipality: म्हापसा पालिकेकडून रस्त्याशेजारी कचरा आणून टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Mapusa Municipality: म्हापसा पालिकेने कारवाई करत अर्ध्या तासात दहा जणांकडून 50 हजार रुपये वसूल केले.
Mapusa Municipality
Mapusa MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipality: म्हापसात रात्री काळोखाचा गैरफायदा घेत शहरातील रस्त्याशेजारी कचरा आणून टाकणाऱ्यांवर पालिकेने कठोर कारवाई करीत शुक्रवारी रात्री अर्ध्या तासात 50 हजार रुपये दंड वसूल केला. दरम्यान, मागील वीस दिवसांत पालिकेने बेकायदेशीरपणे कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करीत 5 लाखांचा दंड वसूल केला आहे.

शुक्रवारी रात्री, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक अन्वी कोरगावकर, नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर, नगरसेवक विराज फडके तसेच पालिकेचे निरीक्षक, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांनी विविध गट स्थापन करून शहरातील सर्व ब्लॅक स्पॉटवर तैनात झाले.

यावेळी स्थानिक प्रभागांतील नगरसेवकांचीही मदत घेण्यात आली. हे कोम्बिंग ऑपरेशन राबवत अर्ध्या तासात 50 हजारांचा दंड कचरा फेकणाऱ्यांना ठोठावला. यावेळी एका रिक्षा चालकांस 25 हजारांचा दंड ठोठावला. त्या वाहनातून मांसाहरी कचरा आणला होता.

Mapusa Municipality
Goa Police: वाळपई पोलिस 'ॲक्शन मोड'नंतर पालक आले भानावर; कारवाईची अल्पवयीन चालकांना धास्ती

टाकतो कोण आणि भरतो कोण

मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर म्हणाले की, रात्रीच्या वेळी लोक शहरातील ब्लॅक स्पॉटवर कचरा आणून टाकतात आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तो दुसऱ्या दिवशी साफ करावा लागतो. अशा उल्लंघनकर्त्यांमुळे शहरात ठिकठिकाणी गलिच्छ रूप आले आहे. म्हापशात 46 ब्लॅक स्पॉट असून महिन्याभरात आम्हाला हे सर्व ब्लॅक स्पॉट शून्यावर न्यायचे आहेत.

शुभांगी वायंगणकर, म्हापसा नगराध्यक्ष-

काही लोकांकडून इथे कचरा फेकला जातो. परिणामी, शहरवासीय पालिकेस जबाबदार धरतात. मुळात दररोज साफसफाई करून कचऱ्याचे वर्गीकरण करतो. मात्र, काही बेशिस्त व्यक्तींमुळे पालिकेला लोकांची बोलणी खावी लागतात. त्यामुळे आम्ही ही मोहीम उघडली असून दंडात्मक कारवाई करतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com