Goa Taxi App : जीटीडीसीच्या टॅक्सी नोंदणीकडे पेडणेवासीयांची पाठ; स्थानिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा...

'टुगेदर फॉर मोपा एअरपोर्ट'चा सरकारला इशारा
GTDC Taxi Counter
GTDC Taxi CounterDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा विमानतळावर टॅक्सी नोंदणीसाठी टॅक्सीवाल्यांना गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) सूचना देण्यात आली होती. टॅक्सीवाल्यांना नवीन विमानतळावर जीटीडीसीचा टॅक्सी काऊंटर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच तेथे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी सक्तीची केली आहे. पेडणे तालुक्यातील टॅक्सीवाल्यांना या काऊंटरवर प्राधान्य दिले जाणार होते परंतु जीटीडीसीच्या टॅक्सी ऍप नोंदणीकडे पेडणेतील टॅक्सीचालकांनी पाठ फिरवली आहे. मोपावर पेडणेकरांसाठी स्वतंत्र यलो-ब्लॅक काऊंटर देण्याच्या मागणीवर पेडणेकर ठाम आहेत.

GTDC Taxi Counter
Panaji: कालवी स्कूलबस अपघात प्रकरण! 10 वर्षानंतर बस चालकाची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका

जाहीर करण्यात आलेल्या सूचनेत ‘जीटीडीसी’ने अखिल गोवा टुरिस्ट आणि अखिल भारत परवाना असलेल्या टॅक्सीना नोंदणीसाठी येण्याची सूचना केली होती. नोंदणीचा अर्ज पर्यटन खात्‍याच्‍या संकेतस्थळावर किंवा नोंदणी सुविधा केंद्र (आरसीएफ) पर्यटन भवन पाटो - पणजी, उत्तर गोवा आणि माथानी साल्ढाणा संकुल - मडगाव, दक्षिण गोवा येथे उपलब्ध करण्यात आले असल्याचे सूचनेत स्पष्ट करण्यात आले होते. आरसी प्रत, पथकर, फिटनेस प्रमाणपत्र, प्रदूषण प्रमाणपत्र, टुरिस्ट वाहन या नोंदणीसाठी आवश्‍यक दस्तावेजांची यादी देण्यात आली होती. टॅक्सीच्या मालकांनी चालकाची पुष्टी केली असून त्याला वाहन चालवण्याची परवानगी देणारे पत्र सादर करावे लागेल. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना आवश्‍यक आहे, तसेच टुरिस्ट वाहन चालवण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे.

GTDC Taxi Counter
Goa Police: ताळगावत मालकाच्याच फ्लॅटमध्ये चोरी करुन पसार झालेल्या दोघा चोरट्यांना पकडण्यास पणजी पोलिसांना यश

दरम्यान पेडणे तालुक्यातील टॅक्सीवाल्यांना या काऊंटरवर प्राधान्य दिले जाणार होते परंतु जीटीडीसीच्या टॅक्सी ऍप नोंदणीकडे पेडणेकरांनी पाठ फिरवली आहे. मोपावर स्थानिकांसाठी यलो-ब्लॅक काऊंटर देण्याच्या मागणीवर पेडणेकर ठाम आहेत. स्थानिकांच्या संयमाचा उद्रेक होऊ न देण्याचा 'टुगेदर फॉर मोपा एअरपोर्ट'ने सरकारला इशारा दिला आहे. सरकारने या टॅक्सी ॲपला मंजुरी दिली असून ५ जानेवारीपासून हे ॲप सुरू करणार असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पर्यटनमंत्री आणि वाहतूकमंत्र्यांनी केली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com