Speed Radar Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police : ‘स्पीड रडार गन्स’ वापरात अडथळा; फलकांचा अभाव, पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता

पालिका, पंचायतींकडून अंमलबजावणीत चालढकल

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Transport Department : राज्यातील वाहनांवर वेगमर्यादेचे नियंत्रण ठेवण्यासाठी काही दिवसांपूर्वी वाहतूक खात्याने पोलिसांना दहा ‘स्पीड रडार गन्स’ दिल्या होत्या. मात्र, राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अनेक रस्त्यांच्या बाजूने वेगमर्यादेचे सूचना फलक नसल्याने त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा येत आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी वेगमर्यादेसंदर्भातच्या सूचना फलकांच्या अधिसूचना यापूर्वीच काढलेल्या असल्या, तरी संबंधित भागातील पालिका व पंचायतींकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पूर्वी नादुरुस्त झालेल्या ‘स्पीड रडार गन्स’ अजूनही दुरुस्त झालेल्या नाहीत.

सध्या काही स्पीड रडार गन्सचा वापर पणजी, म्हापसा, फोंडा व मडगाव या महामार्गावर होत आहे. पोलिसांना प्रशिक्षणाद्वारे या यंत्रणेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आज या प्रमुख रस्त्यांवर स्पीड रडार गन्स उभी करून सुमारे ३८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच पुलाच्या ठिकाणी या रडार गन्सचा वापर करण्यात येत असून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या वाहनांची वेगमर्यादा मोजण्याची या यंत्रामध्ये क्षमता आहे.

रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्या वाहनचालाकांना न थांबवता त्यांची माहिती या स्पीड रडार गन्सद्वारे छायाचित्र नोंदवून त्यांच्या व्हॉटस्अपवर किंवा वाहनमालकाच्या पत्त्यावर त्याच दिवशी पाठवली जाते.

अंतर्गत रस्ते, राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच पुलावरील वेगमर्यादेची माहिती अलीकडेच जाहीर करण्यात आली आहे, तरीही काहीजण रस्त्याच्या बाजूने सूचना फलक नसल्याने त्याचा फायदा घेऊन वेगाने वाहने हाकतात. सूचना फलक लावल्यानंतर राज्यात महामार्गावर दरदिवशी स्पीड रडार गन्सची अंमलबजावणी करून वाहनचालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली जाणार आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता

सध्या वाहतूक पोलिस विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे गृहरक्षकांची मदत घेतली जात आहे. तरीही वाहतुकीची कोंडी, नो पार्किंग क्षेत्रातील वाहने तसेच वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्धच्या कारवाईसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी नव्याने गृहरक्षकांची भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या गृहरक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

"अत्याधुनिक स्पीड रडार गन्सचे वितरण वाहतूक कक्षांना करण्यात आले असून त्याचा वापर महामार्गांवर केला जाणार आहे. वेगमर्यादेचे नियंत्रण असूनही त्याचे पालन वाहनचालक करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांना शिस्त लावण्यासाठी लवकरच धडक मोहीम सुरू केली जाईल."

"स्पीड रडार गन्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्या वाहनांचे क्रमांक अचूकपणे टिपणे शक्य होत आहे. राज्यभर वेगमर्यादा सूचना फलक रस्त्याच्या बाजूने लावल्यानंतर ज्या ठिकाणी ओव्हरटेक व वेगमर्यादेचे उल्लंघन होते तेथे ते लावण्यात येतील."

- बोसुएट सिल्वा, वाहतूक पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचा रौद्रावतार! 10 षटकार अन् 8 चौकारांसह ठोकलं शानदार शतक; न्यूझीलंडच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

SCROLL FOR NEXT