Kadamba Majhi Bus Yojana: कदंब महामंडळ खासगी बसगाड्या सेवेत घेणार असल्याचे यापूर्वीच जाहीर झाले होते. त्यानुसार ‘माझी बस योजना’ 15 जूनपासून कार्यान्वित केली जाणार असून राज्यातील तीन मार्गांवर 287 खासगी बसगाड्या धावणार असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी दिली.
पर्वरी येथील महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे उपस्थित होते.
खासगी बसगाड्या सेवेत घेण्यासाठी खासगी बसमालकांबरोबर ६ व ९ जून रोजी बैठक झाली होती. सध्याचा विचार केला, तर १ हजार १०४ पैकी ५७८ खासगी बसगाड्या सेवेत आहेत.
कोरोना काळापासून अनेक बसगाड्या बंद पडल्या आहेत, त्यांनाही या सेवेत सामावून घेतले जाईल. या बसगाड्यांमध्ये ट्रॅकिंग सिस्टम असेल.
त्याशिवाय त्यांना वार्षिक ६० हजार किलोमीटर धावण्याची अट असेल. कदंबने पाच वर्षांच्या कालावधीसाठी मासिक आधारावर सरकारी विभागांसाठी टॅक्सी भाड्याने देण्याची सुविधा सुरू केल्याचा उल्लेख यावेळी तुयेकर यांनी केला.
या ठिकाणाहून धावतील बसगाड्या
मडगाव ते काणकोण : एकूण ४१ बस
कुडचडे-केपे-मडगाव : एकूण १०२ बस
कुडचडे-फोंडा-पणजी-फोंडा : एकूण १४४ बस
आसन व्यवस्थेनुसार बसधारकांना मिळणारी प्रति कि.मी. रक्कम
२३ ते २६ किमी : 29 रुपये
२७ ते ३८ किमी : 34 रुपये
३९ ते ४६ किमी : 36 रुपये
प्राथमिक तत्त्वावर ही योजना सहा महिन्यांसाठी असणार आहे. 15 जूनपासून सुरू होणाऱ्या या सेवेची मुदत डिसेंबरमध्ये संपेल.
योजनेमुळे रात्री उशिरापर्यंत, सकाळी लवकर सेवा शक्य.
जुलैपर्यंत बस ॲप आणि ट्रॅकिंगमुळे सुविधा अपडेट
राज्य सरकारकडून योजनेसाठी
२ कोटींची तरतूद
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.