Goa Politics : पक्षाने सांगितले तर राज्यसभा लढणार : तानावडे

मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली नाहीत
Sadanand Shet Tanavade
Sadanand Shet TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

Sadanand Shet Tanavade : येत्या लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल असे सांगत पक्षाने सांगितले तर मी राज्यसभेची निवडणूक लढवेन, असे आज भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

विद्यमान राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत येत्या जुलैमध्ये संपत असल्याने त्या जागेवर कोणाला पाठवले जाणार? याबद्दल राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तानावडे यांना विचारले असता पक्षाने सांगितले आणि वरिष्ठ नेत्यांची इच्छा असेल, तर राज्यसभेची निवडणूक लढवेन.

मात्र, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अद्यापही आपल्याला काही सांगितलेले नाही, असेही ते म्हणाले.

Sadanand Shet Tanavade
Kadamba Bus Services: खुशखबर! गुरुवारपासून सुरू होतेय कदंबची ‘माझी बस’ योजना; मार्ग, भाडे, सुविधा जाणून घ्या

तानावडे पुढे म्हणाले, की पक्षात इतर पक्षातून काही नेते आले, तर त्याचा मतदानावर परिणाम होतोच असे नाही. पक्षाने केंद्रात गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केलेला विकास, डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेली प्रगती या आधारे राज्यातील जनता येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना जनता भरघोस मतांनी विजयी करेल.

मागील निवडणुकीत दक्षिण गोव्याचा आमचा उमेदवार केवळ 9 हजार मतांनी पराभूत झाला होता. तेव्हा आमच्यासोबत दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, बाबू कवळेकर, रवी नाईक नव्हते. या सर्वांचा विचार करता दक्षिण गोव्यातील जागा आम्ही ३० हजार मताधिक्याने जिंकू अशी आशा आहे.

Sadanand Shet Tanavade
Tax Devolution To Goa: गोव्याला 457 कोटी; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय वरिष्ठांचा

गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेसमधून आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत, असे आज तानावडे यांनी सांगितले.

या आमदारांनी पक्षात प्रवेश केला, त्यावेळी माझ्याशी कोणत्याच प्रकारची चर्चा झाली नव्हती. ही सर्व चर्चा वरिष्ठ पातळीवर झाली होती. त्यामुळे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील आणि तो निर्णय मुख्यमंत्र्यांना सांगितला जाईल, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com