BJP Win | Ganesh Gaonkar News | Goa election result 2022 news  Dainik Gomantak
गोवा

सावर्डेत गणेश गावकरांवर पक्षाने ठेवलेला विश्वास सार्थ

आमदार दीपक प्रभू पाऊसकर यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारून माजी आमदार गणेश गावकर यांना दिली

दैनिक गोमन्तक

केपे: मगो पक्षातून भाजपात दाखल झालेले सावर्डेचे आमदार दीपक प्रभू पाऊसकर यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारून माजी आमदार गणेश गावकर यांना दिली होती. पक्षाने गावकर यांच्यावर ठेवलेला विश्वास गावकर यांनी सार्थ ठरवत पाऊसकर यांचा पाच हजार मतांनी पराभव केला. (Ganesh Gaonkar News)

सावर्डे मतदारसंघातून 2017 निवडणुकीत दीपक पाऊसकर यांनी भाजपचे गणेश यांचा पराभव केला होता व नंतर 2019 मध्ये पाऊसकर यांनी भाजपात प्रवेश करून सार्वजनिक बांधकाम खाते पदरात पाडून घेतले होते. (Goa election result 2022 news)

सार्वजनिक बांधकाम खाते मिळूनसुद्धा पाऊसकर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी बरेच मागे पडले तसेच त्यांनी आपल्या खात्यातील नोकऱ्या विकल्या असा आरोप भाजपचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी केल्याने पाऊसकर बरेच अडचणीत आले होते. याच कारणाने त्यांची उमेदवारी गेली होती.

सावर्डे मतदारसंघातून अखेरच्या क्षणी भाजपने उमेदवारी गणेश गावकर यांना दिल्याने अखेर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. गावकर यांच्या प्रचारात युवकांनी चांगले काम केल्याने आपला विजय झाल्याचे गावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Petrol Diesel Supply Status: पेट्रोल पंपांवर दुसऱ्या दिवशीही रांगा! राज्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचा इंडियन ऑईलचा निर्वाळा

Team India Cricket Schedule: BCCI चा धमाका! टीम इंडियाचं 2026-27 मधील देशातील हंगामाचं वेळापत्रक जाहीर; 17 शहरात रंगणार 22 सामन्यांचा थरार

Israel US Iran War: इराणला मोठा झटका! इस्रायली हल्ल्यात IRGC नौदल प्रमुख अलीरेझा तांगसिरी यांचा मृत्यू; होर्मुझच्या खाडीत तणाव शिगेला

Petrol Diesel Price Hike: इंधन दरवाढीचा सामान्यांना मोठा दणका! 'या' कंपनीकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत भरघोस वाढ; अफवांनी पंपांवर रांगाच-रांगा

Israel US Iran War: मध्य पूर्वेतील युद्धाच्या धामधुमीत भारताची मोठी खेळी! डॉलरची 'दादागिरी' संपवण्यासाठी रुपयाचा मास्टरस्ट्रोक; जगाचे विस्फारले डोळे

SCROLL FOR NEXT