Hill Cutting Dainik Gomantak
गोवा

Hill Cutting : ‘सीआरझेड’ नियम धाब्यावर बसवत मांद्रेत डोंगरकापणी

काँक्रिटीकरणाचा सपाटा ! वाढती अवैध बांधकामे कशी रोखावीत; याबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता

गोमन्तक डिजिटल टीम

Hill Cutting मांद्रे गावाला गतवेळी स्वच्छ किनारा म्हणून राष्ट्रीय पातळीवरील पर्यटन क्षेत्राशी निगडित प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

आता दुसऱ्या बाजूने मांद्रे गावात मोठ्या प्रमाणात डोंगर कापून व्हिलास, इमारती उभारल्या जात असल्यामुळे बिल्डर, रियल इस्टेट व्यावसायिकांनी काँक्रिटीकरणाचा सपाटा लावल्याचे दिसत आहे.

ही बांधकामे कशी रोखावीत, यावर गावातील काही मंडळी जागृत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. किनारी भागात ‘सीआरझेड’चे उल्लंघन करून ज्या प्रमाणात यापूर्वी बांधकामे उभी राहिलेली आहेत.

त्याचप्रमाणे आता डोंगर माळरानावर किंवा रस्त्यालगत शेतात मातीचा भराव टाकून मोठ्या अपार्टमेंटस् , चार-पाच मजली इमारती उभ्या राहत आहेत. आणि बिगर गोमंतकीयांबरोबरच स्थानिकही या इमारतींच्या बांधकामात सक्रिय दिसतात.

व्हीला उभारणीचा विषय मांद्रे पंचायत मंडळाने गंभीरपणे घ्यावा ,अशी मागणी यापूर्वीच ग्रामस्थांनी केली आहे. फ्लॅट संस्कृतीमुळे गावच्या संस्कृतीला धोका पोहोचेल, अशी भीती आहे.

मांद्रे कष्टकरी शेतकऱ्यांचा गाव, मात्र येथील काही कुटुंबांनी काही कारणांनी जमिनी बिल्डरांना विकल्या. तिथे आता बांधकामे उभी राहणार आहेत. गावात अपार्टमेंट, व्हीला संस्कृती बस्तान मांडत आहे.

आश्वे मांद्रे किनारी भागातील व डोंगरावरील जमीन महाशिर हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी फतेह सिंग यांनी विकत घेतली आहे. या ठिकाणी हॉटेल प्रकल्प उभारून स्थानिकांना रोजगारसंधी देण्यात येईल, असे त्यांनी ग्रामसभेत दिले होते.मात्र, त्यांनी व्हीला उभारले. हा मुद्दा दर ग्रामसभेत गाजतो.

डोंगरकापणीमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.पंचायतीला वेळीच कठोर कारवाई करावी लागेल.बहुतेक टेकड्या विकल्या गेल्या आहेत आणि बांधकाम व्यावसायिकांनी कायदे वाकवून इमारत बांधल्या आहेत.

स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी भावी मतदारांच्या रक्षणासाठी सर्व गावांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे. डोंगरकापणी रोखण्यासाठी गावकऱ्यांनी आवाज उठवायला हवा.

- ॲड.प्रसाद शहापूरकर

बेकायदा बांधकामापेक्षा डोंगर कापणी हा खूपच घातक प्रकार आहे. डोंगर कापणीतून निसर्गाचा आपण विनाश करत असून पुढील पिढीसमोर अनेक संकटे निर्माण करत आहोत. सर्वत्र खुलेआम डोंगरकापणी केली जात आहे.

सरकारी यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधींसह सगळेच गप्प बसून आहेत. आज प्रत्येक गोष्टीत न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागत आहेत. कुंपण शेत खात असल्यानेच जनता हतबल झाली आहे.

- जगन्नाथ पार्सेकर, ग्रामस्थ

आपण 1996 पासून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे. हाऊसकीप स्टाफ म्हणून सुरुवात केली आणि 2006 नंतर गोव्यात पर्यटन, विशेष हॉटेल्सचा विस्तार पाहिला. पूर्वीचे गोवा म्हणजे कळंगुट आणि बागा किनारा, पण हळू हळू मांद्रे.

उत्तर गोव्यातील मोरजी आकर्षणाचे केंद्र बनले. दिल्ली, मुंबई, बंगलोर, तेलंगण, आंध्र येथील राजकीय नेते, श्रीमंत लोकांनी याकडे त्यांच्या पैशाच्या गुणाकाराची मोठी संधी म्हणून पाहिले. त्यांनी मग जमिनी विकत घेतल्या.

- सुदेश सावंत, मांद्रे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT