Ponda News: मडकई, फोंड्याला ‘हायड्रोलिक लिफ्ट’

वीज खात्याला भेट : वीजमंत्री सुदिन ढवळीकरांकडून ‘गाडी’ प्रदान
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News मडकई आणि फोंडा परिसराला विजेच्याबाबतीत साहाय्यभूत ठरेल यासाठी नवीन हायड्रोलिक लिफ्ट सुविधा असलेली गाडी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम शनिवारी झाला.

यावेळी माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त तथा सामाजिक कार्यकर्ते मिथिल ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते तसेच इतर पंचसदस्य, वीज खात्याचे सहायक अभियंता केशव गावडे तसेच इतर अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Ponda News
Sanquelim Municipal Elections 2023: साखळीत सर्वच उमेदवारांनी साधला ‘सुपर संडे’

मडकई हा परिसर निसर्गसंपन्न असून झाडावेलींनी नटलेला हा प्रदेश असून बऱ्याचदा या भागात पावसाळ्यात किंवा वादळी वाऱ्यात वीजवाहिन्या तुटण्याचे प्रकार होतात, त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो.

नेहमीची वीज समस्या दूर करण्यासाठी मडकई मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम जोरात सरू आहे.

पूर्ण मडकई मतदारसंघ तसेच फोंडा, प्रियोळ, शिरोडा आदी मतदारसंघातही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू असून पथदीप दुरुस्तीसाठी आता नवीन हायड्रॉलिक पद्धतीची गाडी वीज खात्याकडे सुदिन ढवळीकर यांनी सुपूर्द केली आहे.

कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर लगेच आपण चर्चा करून निर्णय घेतला आणि पथदीप दुरुस्तीसाठी अशा प्रकारची गाडी सुपूर्द करण्यात आपल्याला आनंद होत असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले.

Ponda News
Guirim Pipeline Burst: गिरी सर्विस रोडनजीक असलेली पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाण्याची नासाडी

बांदोडा येथे झालेल्या या कार्यक्रमात सुदिन ढवळीकर यांनी गाडीची विधिवत पूजा केली व वीज खात्याच्या अधिकाऱ्यांकडे ही गाडी सुपूर्द केली.

या हायड्रोलिक लिफ्ट गाडीमुळे मडकई मतदारसंघातील पथदीप दुरुस्तीचे काम जलदगतीने होण्यास मदतच होणार असून ही गाडी फोंडा तसेच प्रियोळ व शिरोडा मतदारसंघासाठीही वापरता येणार आहे.

त्यामुळे पूर्ण फोंडा तालुक्यासाठी ही गाडी उपयुक्त ठरेल. मडकई मतदारसंघाला नेहमीच चांगले ते दिले आणि यापुढेही आपला चांगल्यासाठी अट्टहास असेल. फक्त नागरिकांचे सहकार्य आतापर्यंत मिळाले, तेच पुढे मिळावे, अशी अपेक्षा ढवळीकर यांनी व्यक्त केली.

Ponda News
Margao News: पार्किंग प्लाझाला राजकीय ग्रहण

पहिल्यांदाच असा उपक्रम

वीज खात्याला अशा प्रकारची हॉयड्रॉलिक लिफ्ट असलेली गाडी प्रदान करण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच गोव्यात होत आहे. अशी तत्परता आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दाखवल्यामुळे पथदीप दुरुस्ती करताना यापुढे वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना अडचणीचे ठरणार नाही.

सुदिन ढवळीकर यांनी ही गाडी उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला, त्याचा फायदा नागरिकांनाच होणार असून पथदीपांअभावी रस्त्यांवर आता काळोख पडणार नाही, असे वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com