मगो Dainik Gomantak
गोवा

मांद्रेत आतापर्यंत मगोचे आमदार हे मतदारसंघाबाहेरील!

आरोलकर हेही आरोबा येथील

दैनिक गोमन्तक

निवृत्ती शिरोडकर

मांद्रे: मांद्रे मतदारसंघातील 1963 ते 2022 या विधानसभेच्या निवडणुकीत आतापर्यंत मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार हे मतदारसंघाबाहेरील आहेत. स्थानिक उमेदवारांना आमदार बनण्याची संधी अजूनली मिळाली नसल्याने ते आमदार बनण्यापासूनच दूर राहिले आहेत.

या मतदारसंघातून निवडून आला, तो आमदार, मंत्री झाल्यानंतर पुन्हा कधीच निवडून आला नाही. सध्या मगोच्या उमेदवारीवर निवडून आलेले जीत आरोलकर हेही मूळ मतदारसंघातील नसून, ते आरोबा या ठिकाणचे आहेत. सध्या ते मांद्रे मतदारसंघात वास्तव्य करून आहेत. त्यामुळे ते स्थायिक आहेत, स्थानिक नव्हे.

1963 साली पहिल्यांदा विजय कामूलकर मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले, ते कोरगाव भागातील होते. 1967 ॲन्थोनी डिसोझा निवडून आले. ते साखळीतील होते तर 1972 साली भाऊसाहेब बांदोडकर निवडून आले तेही पणजी भागात राहत होते. 14 फेब्रुवारी रोजी भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन झाल्यानंतर 1974 साली पोटनिवडणूक झाली आणि त्या पोट निवडणुकीत म्हापशातील रमाकांत खलप निवडून आले. त्यानंतर 1977, 1980, 1984, 1989 तसेच सलग पाच वेळा निवडून आल्यानंतर त्यांना 1994 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

त्या निवडणुकीत काँग्रेसच्या संगीता परब निवडून आल्या. पुन्हा 1999 साली रमाकांत खलप मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले. त्यानंतर 2002, 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत भाजपचे प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर विजयी ठरले. तर 2017च्या निवडणुकीत काँग्रेसचे दयानंद सोपटे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 च्या पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर सोपटे निवडून आले. 2022 च्या निवडणुकीत मात्र तब्बल 22 वर्षांनंतर मगो पक्षाच्या उमेदवारीवर युवा जित आरोलकर हे आमदार म्हणून विजयी झालेले आहेत.

मगो पक्षाने आतापर्यंत जे जे उमेदवार दिले ते उमेदवार आमदार म्हणून निवडून आले आहेत ते मांद्रे मतदारसंघातील नव्हेत. आताही आरोलकर हे मूळ आरोबा धारगळ गावातील आहेत. परंतु त्यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी आपली कारकीर्द मांद्रे मतदारसंघात सुरू करत असताना त्यांनी आपले वास्तव्य मांद्रे मतदारसंघात केलेले आहे. त्यामुळे ते स्थानिक की स्थायिक हा मुद्दा जरी महत्त्वाचा नसला तरी इतिहास पाहताना मगो पक्षाचे आमदार हे मांद्रे मतदारसंघाबाहेरील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

SCROLL FOR NEXT