केळबाय देवस्थान निवडणुकीला स्थगिती

मयेत अधिकाराच्या मुद्यावरन एक गट आक्रमक
Kelbay Devasthan
Kelbay Devasthandainik gomantak
Published on
Updated on

डिचोली : अधिकाराच्या मुद्यावरून एका गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याने मयेतील श्री माया केळबाय देवस्थान समितीची आज (रविवारी) होणारी निवडणूक अखेर झालीच नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून अखेर डिचोलीचे मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवली. नाईक आणि अन्य गटातील प्रतिनिधीशी चर्चा करूनच या वादावर तोडगा काढून निवडणुकीची नवीन तारीख निश्चित करण्यात येणार आहे. (Postponement of Kelbay Devasthan election)

देवस्थान प्रशासनाच्या आदेशानुसार डिचोली तालुक्यातील अन्य नोंदणीकृत देवस्थानांसह मये (Maye) येथील श्री माया केळबाय देवस्थानची (Shri Maya Kelbay Devasthan) निवडणूक घेण्यात येणार होती. यामधून पुढील तीन वर्षांसाठी समिती निवडण्यासाठी आज (रविवारी) सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. डिचोली मामलेदार कार्यालयाचे तलाठी रुपेश पालकर यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक प्रक्रिया होणार होती.

मात्र प्रक्रिया सुरु होण्याअगोदरच नाईक, गोसावी आणि गावस गटातील नागरिकांनी निवडणूक बेकायदा असल्याचा दावा करत निवडणूक घेण्यास जोरदार हरकत घेतली. निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याचा आम्हाला हक्क असल्याचा दावा हरी नाईक गावकर आणि इतरांनी केला. मात्र मतदार (Voters) यादीत नाईक, गोसावी आणि गावस गटातील कोणाचेच नाव नसल्याचे निरीक्षकांनी स्पष्ट केले. त्यावर नावे बेकायदेशीरपणे गाळल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे.

Kelbay Devasthan
काणकोणमध्ये मुलीचा मृत्यू आईचा तपास सुरू, घटना संशयास्पद

आमचा अधिकार द्या, मगच प्रक्रिया करा!

आमचा अधिकार द्या आणि मगच निवडणूक प्रक्रिया सुरू करा, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. या मुद्यावरुन वातावरण तापत गेले. अखेर या वादाची कल्पना देताच डिचोलीचे (Dicholi) मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर दुपारी सभेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी नाईक आणि इतर गटातील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. निवडणूक प्रक्रिया पुढे चालू केली तर तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढल्याने अखेर मामलेदारांनी निवडणूक (Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com