Inaugurate Waste Project in Honda, Goa Dainik Gomantak
गोवा

होंड्यात होणार कचरा प्रकल्पाचे आज उद्घाटन

होंड्यात कार्यक्रम: मंत्री विश्‍वजीत व दिव्या राणे उपस्थित

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे मंगळवारी (दि.3) दुपारी चार वाजता आरोग्य मंत्री विश्वजीत राणे तसेच पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांची पायाभरणी काही दिवसांपूर्वीच सरपंच आत्मा गावकर यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यामुळे कचरा गोळा करून त्यांच्यावर तांत्रिक पद्धतीने प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारून स्वंयपुर्ण बनलेली पाहिली पंचायत म्हणून होंडा पंचायतीची गणना झाली आहे. (Inaugurate Waste Project in Honda, Goa)

प्रकल्प उभारणीसाठी पंचायतीच्या मालकीच्या जागेचा वापर करण्यात आला आहे. तेथे होंडा पंचायत क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची वेगवेगळी विभागाची करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सदर प्रकल्पात साधन सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. या पुर्वी सदर पंचायतीच्या वतीने कचरा गोळा करून पंचायत मालकीच्या बागायती मध्ये डंप केला जात होता. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीची समस्या निर्माण झाली होती.

या समस्येची दखल घेऊन होंडा पंचायतीच्या वतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेऊन काही दिवसात या प्रकल्पांचे काम मार्गी लावले आहे, त्यामुळे यापुढे होंडा पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची वेळोवेळी उचल होऊन त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून रोजगार निर्मिती होण्यास फार मदत होणार आहे. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ दिव्या राणे यांची उपस्थिती, कचरा विल्हेवाट लावण्यासाठी यशस्वी ठरलेली तालुक्यातील पाहिली पंचायत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT