गोव्यातील कामगारांना उच्च शिक्षणाची संधी...

कामेश्वरी मूर्ती: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातर्फे कामगारांना आवाहन
IGNOU
IGNOUDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मोरजी: कामगारांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठीच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे. आम्ही 12 वी पास विद्यार्थ्यांना नोकरी करत असताना उच्चशिक्षित होण्यासाठी मदत करतो. त्यामुळे जन शिक्षण संस्थान गोवातर्फे पालये (पेडणे) येथे चालू असलेल्या उपजिविका केंद्रात काम करणाऱ्या महिला तसेच लाभार्थी यांना आवाहन करतो की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या क्षेत्रीय संचालिका डॉ.कामेश्वरी मूर्ती यांनी मांद्रे पंचायत सभागृहात जन शिक्षण संस्थान गोवा तर्फे आयोजित आंतर्राष्ट्रीय कामगार दिनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या अधिकारी लक्ष्मी सावंत व जन शिक्षण संस्थान गोवा चे संचालक श्रीहरी आठल्ये उपस्थित होते.

IGNOU
'पाण्यासाठी जीवनदायिनीचे ठरेल महत्त्वपूर्ण योगदान'

पालये गावात रंजना न्हानजी यांच्या अगरबत्ती व ज्युट बॅग बनविण्याच्या व्यवसायात काम करणा-या महिलांनी परिश्रमाने स्वत:ला सिद्ध केलेले आहे. यापुढे जाऊन ईग्नू (इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ) तर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध कोर्सच्या माध्यमातून स्वत:ला विद्यमान परिस्थितीशी संतुलन राखण्यासाठी सक्षम बनवावे, असे लक्ष्मी सावंत यांनी सांगितले. गेले तीन दिवस चालू असलेल्या पुरुमेद''22 व्होकल फॉर लोकल प्रदर्शन व विक्री दालनांमध्ये सहभागी होणा-या छोट्या व्यावसायिकांना पुष्प देऊन डॉ.कामेश्वरी मूर्ती यांच्या हस्ते गौरवण्यात आले. जन शिक्षण संस्थान गोवा च्या कौशल्य शिक्षिका नेत्रा मांद्रेकर व व्यवसायी रंजना न्हानजी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com