Rain in Goa's Namoshi Guirim Area Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात पावसाचं धूमशान! अतिवृष्टीमुळे नामोशी-गिरीतील शाळेजवळील रस्त्यावर पाणीच पाणी

Rain in Goa's Namoshi Guirim Area: ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?’ हे बालगीत पावसाळ्यात हमखास ऐकायला मिळायचे.

गोमन्तक डिजिटल टीम

‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?’ हे बालगीत पावसाळ्यात हमखास ऐकायला मिळायचे. परंतु अलीकडे ते क्‍वचितच कानी पडते. गेल्या काही दिवसांपासून पडण‍ाऱ्या पावसामुळे सर्वत्र कहर माजला आहे.

या अतिवृष्टीमुळे नामोशी-गिरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाभोवतीच्या रस्त्यांवर सलग चार दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने या शाळेच्या हजेरीपटावर परिणाम होत आहे. त्‍यामुळे ‘सांग सांग भोलानाथ...’ या गीताचे बोल सध्या तंतोतंत प्रत्यक्षात उतरले आहेत.

नामोशी-गिरी येथील जंक्शनवर सरकारी माध्यममिक विद्यालय आहे. सकाळच्या सत्रात प्राथमिक (५वी ते दहावी) व दुपारच्या सत्रात पूर्वप्राथमिक (पहिली ते चौथी) शाळा भरते. प्राथमिकमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २११ इतकी आहे तर पूर्व प्राथमिकमध्ये एकूण १०५ विद्यार्थी शिकतात. परंतु, सध्या शाळेच्या चारही बाजूने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिल्याने या शाळेच्या हजेरीपटावर परिणाम होत आहे.

सरकारने मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता. ८) राज्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, मंगळवारपासून पुन्हा शाळा पूर्ववत झाल्या. तरीही या नामोशी-गिरी सरकारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेभोवती पाणी साचून राहिल्याने तसेच या ठिकाणी येण्यासाठी मार्ग नसल्याने मंगळवारी व बुधवारी फक्त ३० ते ४० विद्यार्थीच शाळेला येताहेत.

मंगळवारी पूर्व प्राथमिकचे फक्त चारच विद्यार्थी शाळेत आले. बुधवारी या हजेरीपटात किंचित सुधारणा झाली आणि ही संख्या २५ पर्यंत पोहचली. परंतु, शाळेभोवती पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेला अकारण दांडी मारावी लागते. सरकारने याकडे लक्ष घालून कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी सध्या पालकवर्गातून होत आहे.

रस्‍त्‍यावर भरलेल्‍या पाण्‍यामुळे स्‍कूल बस न्‍यावी लागली माघारी

सरकारने सोमवारी सरकारने अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केली होती. परंतु मंगळवारपासून शाळा पूर्ववत झाल्या, मात्र आमच्या गिरी परिसरातील रस्त्यांवर चारही बाजूने आजही पाणी साचल्याने तसेच मार्गक्रमण करण्यासाठी मोकळी वाट नसल्याने विद्यार्थ्यांच्या हजेरीपटावर परिणाम झालाय, असे विद्यालयातील सूत्रांनी सांगितले. मंगळवारी शाळेची कदंब बस मुलांना

घेऊन पर्वरी बाजूने येत होती. मात्र रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बसचालकाने बस माघारी नेली. कारण विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न होता. या सरकारी शाळेत पर्वरी तसेच आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिकतात.

गिरीतील मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरुप :

गिरी पंचायतीसमोरील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. या पाण्यातून मार्गक्रमण करताना दुचाकीस्‍वारांना बरीच कसरत करावी लागते. काहींची वाहने बंद पडताहेत. परिणामी लोकांना वाहने ढकलत न्यावी लागतात. दुसरीकडे वाहनांचे नुकसान नको म्हणून काही वाहनचालक दूर पल्ल्याच्या मार्गावरून जाणे पसंत करतात. गिरी पंचायतीसमोरील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात मातीचे भराव टाकून अतिक्रमण तथा काँक्रीटकरण झाल्याने शेतातील पाण्याचा निचरा योग्यरित्या होण्यास अडथळा निर्माण होतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT