Goa Rain Update: पाऊस ओसरला, पण धोका कायम! हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट'; धारगळीत महामार्गावर दरड कोसळली

Goa Rain Update: अतिवृष्‍टीमुळे राज्‍यात मोठी हानी झाली असून, 24 तास सातत्‍याने कोसळणाऱ्या पावसाने सकाळी काहीसा विसावा घेतला.
Goa Rain Update: पाऊस ओसरला, पण धोका कायम! हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट'; धारगळीत महामार्गावर दरड कोसळली
Goa Rain UpdateDainik Gomantak

अतिवृष्‍टीमुळे राज्‍यात मोठी हानी झाली असून, 24 तास सातत्‍याने कोसळणाऱ्या पावसाने सकाळी काहीसा विसावा घेतला. हवामान खात्‍याने आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. दक्षिणेत केपे-कुशावती नदीने पातळी ओलांडली असून, उत्तरेत डिचोलीतील काही भागांत अद्याप पाणी कायम आहे. धारगळीत महामार्गावर दरड कोसळली असून त्‍यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

* राज्‍यात गेल्‍या 24 तासांत 9.26 इंच पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून एकूण पर्जन्‍य 57.67 इंच झाले. दक्षिण गोव्‍यात अनेक भागांत पावसाचा फटका बसला. कुशावती नदी दुथडी भरुन वाहू लागली असून पात्र आणि धरण समपातळीवर आले आहे.

* पाऊस वाढला तर नजीकच्‍या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. पारोडा येथील 2 किमी मार्ग सकाळीही पाण्‍याखाली होता. वेर्णा मार्गावर दरड कोसळली, ती वाहतूक विभागाने तातडीने दूर केली.

* शिरवई-केपे मार्गावरही पाणी आल्‍याने वाहतूक विस्‍कळीत झाली. धारगळ महामार्गावर दरड कोसळल्‍याने एकेरी वाहतूक सुरु आहे.

* पेडणे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर तसेच वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने तसेच काहींच्या घरावर झाडे पडल्याने नुकसान झाले.

* सासष्टी तालुक्यात सुरावली रेल्वे सबवे पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. माजोर्डा, उतोर्डा येथील अंतर्गत भागात शेतातील पाणी वाढून रस्ते पाण्याखाली गेले. मडगाव-मुंगूल येथेही पाण्याची पातळी वाढत असून पाऊस आणखी पडला तर हा रस्ता देखील पाण्याखाली जाऊ शकतो.

* डिचोली बाजारात मध्‍यरात्री पाणी शिरले. व्‍यापाऱ्यांनी दक्षता घेऊन सामान वेळीच अन्‍यत्र हलविल्‍याने मोठे नुकसान टळले.

Goa Rain Update: पाऊस ओसरला, पण धोका कायम! हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट'; धारगळीत महामार्गावर दरड कोसळली
Goa Rain Update: राज्यात पावसाचा जोर मंदावला; सरासरी तुलनेत 7 टक्क्यांनी घट

मुंबईत जनजीवन विस्‍कळीत

देशात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या काही तास उशिराने धावत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील (Mumbai) सर्व बीएमसी, सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Goa Rain Update: पाऊस ओसरला, पण धोका कायम! हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट'; धारगळीत महामार्गावर दरड कोसळली
Goa Rain Update: गोव्यात 'यलो अलर्ट': पणजीत सर्वाधिक तापमानाची नोंद

उत्तराखंडमध्ये हाहाकार; चारधाम यात्रा थांबवली

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे केदारनाथ आणि बद्रीनाथ महामार्गासह 115 हून अधिक रस्ते बंद आहेत. भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले तर काही वाहून गेले. यानंतर चार धाम यात्रा थांबवण्यात आली. त्यामुळे 6 हजार भाविक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. गंगा, अलकनंदा, भागीरथीसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हाजवळून वाहत आहेत. चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सुमारे 6 हजार भाविक अडकून पडले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com