Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Kushavati River: दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे केपेच्या कुशावती नदीची पातळी वाढली असून त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही पारोडा रस्ता पाण्याखाली राहिला.
Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली
Kushavati RiverDainik Gomantak

दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे केपेच्या कुशावती नदीची पातळी वाढली असून त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही पारोडा रस्ता पाण्याखाली राहिला. कुशावतीचे पाणी वाढल्याने ती दुथडी भरुन वाहू लागली आहे. नदीचे पाणी आता धरणावरुन वाहू लागल्याने धरण आणि खालचा सखल भाग सम पातळीवर आला आहे.

दरम्यान, काल कुशावतीचे पाणी वाढल्याने पर्वत पारोडा या भागात रस्ता पाण्याखाली गेला होता. आजही हे पाणी न ओसरल्याने सतत दुसऱ्या दिवशी हा रस्ता पाण्याखाली राहिल्याने या भागातील लोकांचा इतर भागांशी संपर्क तुटला होता.

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली
Goa Rain Update: पाऊस ओसरला, पण धोका कायम! हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट'; धारगळीत महामार्गावर दरड कोसळली

यामुळे मडगाव-सांगे वाहतुकीवरही परिणाम झाला. या रस्त्यावरुन येणारी वाहने चांदर भागातून वळवण्यात आली होती. पावसामुळे कित्येक बस मालकांनी आपल्या बसी रस्त्यावर न आणल्याने कामावर जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. मडगावला (Margao) जाणाऱ्या बसीत लोकांची गर्दी वाढली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com