In Goa, the BJP strongly opposes MGP support for the formation of a government Dainik Gomantak
गोवा

सरकार स्थापनेसाठी मगोच्या पाठिंब्याला तीव्र विरोध

दैनिक गोमन्तक

Goa BJP and MGP: 10 मार्चला गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकालापूर्वी राजकीय पक्षांमध्ये अनेक हालचाली पाहायला मिळाल्या. यावेळी मगो पक्षाने आपली बाजू स्पष्ट केली होती. यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमधील (Congress) नेत्यांची भेटदेखील घेतली. मगोप कुणाला पाठिंबा देणार हे निकालानंतरच स्पष्ट करणार असल्याचे सुदिन ढवळीकरांनी (Sudin Dhavalikar) सांगितले होते.

दरम्यान, मडकई भाजप मंडळानाने देखील सरकार स्थापनेसाठी मगोचा पाठिंबा घेण्यास तीव्र विरोध करत आहे. सुदिन केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकारला पाठिंबा देत असल्याचा सुदेश भिंगी यांनी आरोप केला आहे. त्यामुळे पक्षात फुट पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पुढे जाऊन काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र आता भाजपच्याच काही नेत्यांनी मगोच्या पाठिंब्याची भाजपला गरज नसल्याचे विधान केले आहे. मगोची आम्हाला गरज नाही. माझ्यासह गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, मॉविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात यांचा मगोचा पाठिंबा घेण्यास स्पष्ट नकार असल्याचे मत भाजप आमदार रवी नाईक (Ravi Naik) यांनी व्यक्त केल्यामुळे राजकारणात एकाच खळबळ उडालीय.

मात्र यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, 'मगोला सरकारमध्ये घ्यायचे की नाही याचा निर्णय केंद्रीय नेतेच घेतील. इतर जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जाऊ. केंद्रीय निरीक्षक गोव्यात आल्यानंतर सरकार स्थापनेची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.' बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत आलेले भाजप मंडळी आता नेमकी काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT