आमदाराला संतप्त भाजप कार्यकर्त्यांची मारहाण; व्हिडिओ व्हायरल

या घटनेत 24 जण जखमी
crushed the protesters with a car mob beat him in odisha
crushed the protesters with a car mob beat him in odishaDainik Gomantak

सत्ताधारी बिजू जनता दलाच्या (बीजेडी) निलंबित आमदाराने ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीत आपली एसयूव्ही घातली. या अपघातात पोलीस निरीक्षकासह 24 जण जखमी झाले आहेत. पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर संतप्त जमावाने धाव घेत आमदाराला मारहाण केली. यासोबतच आमदारांच्या गाडीला आग लावण्यात आली. पोलिसांनी (police) परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी सुमारे 200 भाजप कार्यकर्ते बनपूर पंचायत समिती कार्यालयाबाहेर चिल्का तलावाजवळ मिरवणूक काढत होते, तेव्हा आमदार प्रशांत जगदेव यांची एसयूव्ही तेथे पोहोचली.

crushed the protesters with a car mob beat him in odisha
21 मध्ये जिओ-एअरटेलचे सर्वात स्वस्त प्लॅन, 3GB डेटा, मोफत कॉल आणि..

दलित भाजप नेत्याला मारहाण केल्याबद्दल गेल्या वर्षी बीजेडीमधून निलंबित करण्यात आलेले जगदेव यांनी त्याची एसयूव्ही कार्यालयाकडे वळवली, सुरुवातीला त्याला पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी थांबवले. पोलिस महानिरीक्षक (मध्य परिक्षेत्र) नरसिंग भोळ यांनी सांगितले की, आमदाराने कोणाचेही ऐकले नाही आणि वाहन पुढे सरकवले, यादरम्यान लोकांना एसयूव्हीने धडक दिली. या घटनेत 24 जण जखमी झाले आहेत. बनपूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर संतप्त जमावाने आमदाराला मारहाण करून जखमी केले.

crushed the protesters with a car mob beat him in odisha
पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसचे राज्यसभेतही नुकसान?

घटनेच्या वेळी आमदार (MLA) मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी आधी पोलिसांशी झटापट केली आणि नंतर काहीही न ऐकता लोकांवर कार चालवल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी जगदेवला त्याच्या वाहनातून ओढले आणि बेदम मारहाण करत त्यांचे वाहन पेटवून दिले. जखमी आमदाराला भुवनेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com