मतमोजणी Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: 'दोन तासांत निकाल शक्य'

जोरात तयारी: एकाचवेळी सर्व 40 जागांची मतमोजणी

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभेच्या चाळीसही मतदार संघातील 1,722 मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची 10 मार्च रोजी मतमोजणी होत आहे. यावेळी 78,94 टक्के मतदान झाले असून अंदाजे 26 हजार टपाली मतदान अपेक्षित आहे. मतमोजणीसाठी अवघा 4 दिवस उरले असून आयोगाने दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू केलेल्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 10 मार्च रोजी यंदा प्रथमच सर्व चाळीसही मतदारसंघाची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार असून केवळ दोन तासांत निकाल लागण्याची शक्यता आहे. साडे दहा वाजेपर्यंत गोव्याच्या विधानसभेचा कौल स्पष्ट होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उत्तर गोव्यासाठी 19 मतदारसंघाची मतमोजणी पणजी येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे दक्षिण गोव्यातील 21 मतदार संघासाठी दामोदर महाविद्यालय मडगाव येथे मतमोजणी होणार आहे. त्यासाठी 1500 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. सोमवारी अंतिम बैठक होईल.

स्ट्राँगरूममध्ये मतदानयंत्रे सीलबंद

14 फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे व्हीव्हीपडसह पणजी आणि मडगाव येथे स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आली असून 20 मार्च रोजी ती टप्प्याटप्प्याने मतमोजणी खोल्यांमध्ये नेण्यात येतील. तिथे त्यांची मतांची मोजणी होईल

सर्वात कमी उमेदवार डिचोली मतदारसंघात

यावेळी 301 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले असून सर्वाधिक 13 उमेदवार शिवोली मतदारसंघात असून सर्वात कमी उमेदवार डिचोली, पर्वरी, सांताक्रुज, मडगाव, बाणावलीत प्रत्येकी पाच आहेत. तर साखळी येथे 12 उमेदवार असून येथे सर्वाधिक मतदान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: अर्शदीप सिंहनं टाकलं 13 चेंडूंचं षटक! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावावर केला लाजिरवाणा रेकॉर्ड

Goa Politics: 'भाजपचं 13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा!' गोव्यात दाखल होताच अरविंद केजरीवाल यांचा सावंत सरकारवर हल्लाबोल VIDEO

Goya Club Seal: परवानग्यांमध्ये घोळ, सुरक्षा नियमांची ऐशीतैशी, वागातोरमधील प्रसिद्ध 'गोया' क्लब सील; गोव्यातील नाईटलाइफला कडक संदेश

Crime News: एकाला फाशी, 9 जणांना जन्मठेप... हिंसाचार करुन हत्या करणाऱ्या नराधमांना कोर्टाचा दणका; काय आहे नेमकं प्रकरण?

VIDEO: भारतीय सागरी सीमेत घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव उधळला, बोट जप्तीसह 11 खलाशी जेरबंद; तटरक्षक दलाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT