‘सोनसोडो’ अजूनही धुमसतोय!

40 ट्रक माती टाकली; तब्‍बल 80 हजार लिटर पाण्‍याचाही वापर
sonsodo garbage fire
sonsodo garbage fire Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : सोनसोड्यावरील आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले असले तरी अधूनमधून ही आग घुमसतच आहे. आग अधिक भडकू नये यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर माती घालण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत सुमारे 40 ट्रक माती कचऱ्यावर (Garbage) टाकण्यात आली असून, ज्या भागात आग लागली होती ती दुसऱ्या बाजूने पसरू नये यासाठी पोकलीन वापरून चर खोदण्यात आला आहे.

sonsodo garbage fire
निकालाआधीच मोर्चेबांधणी; गोवा काँग्रेसच्या रणनीतीची दिल्लीत बैठक

मडगाव (Margao) अग्निशमन दलाचे अधिकारी गिल डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीही परत आग धुमसू लागल्याने दोन गाड्या वापरून कचऱ्यावर पाणी मारून ती विझविली. काल ही आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 80 हजार लिटर पाण्याचा वापर करण्यात आला होता. तरीही रात्री आग परत धुमसल्याने पुन्हा बंब या कचरा यार्डावर आणावे लागले होते.

दरम्यान, या आगीत पालिकेचेही (Municipality) मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. प्लास्टिक कचऱ्याचे बेलिंग करणारी दोन यंत्रे जाळून खाक झाली. त्याशिवाय या ठिकाणी ठेवलेल्या कचरापेट्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com