Goa Drunk Tourist Girl  Dainik Gomantak
गोवा

Goa Drunken Tourist Girl: गोव्यात मद्यधुंद पर्यटक तरूणीचा भर रस्त्यात धिंगाणा; कार अडवून केले ट्रॅफिक जॅम

व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

Akshay Nirmale

Goa Drunken Tourist Girl try to stop cars on road: गोव्यात एका मद्यधुंद तरूणीचा भर रस्त्यात धिंगाणा घालताचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. गोव्याची राजधानी पणजीतील मुख्य रस्त्यावर एका कॅसिनोच्या समोर हा प्रकार घडला आहे.

या व्हिडिओत दिसते की संबंधित तरूणीने प्रचंड मद्य प्राशन केलेले आहे. मद्याच्या अमलाखाली ती बेधुंदपणे येथील एका कॅसिनोसमोरील रस्त्यावर फिरत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या कार अडवून ती कारचालकांशी उगाचच हुज्जत घालताना दिसते. तसेच कारच्यावर हाताना मारतानाही दिसते.

या मुलीचा मित्र रेंट अ कॅब मधील कार चालवताना दिसतो. तथापि, तिने भर रस्त्यात घातलेल्या या धिंगाण्यामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकतर या युवतीने शॉर्ट ड्रेस घातला होता.

त्यामुळे तिच्या जवळ जायचीही कुणाचीही हिंमत्त होत नव्हती. शिवाय ती हेलकांडे खात खात रस्त्याच्या मधूनच चालत होती. त्यामुळे बराच काळ हा सर्व प्रकार सुरू होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार युवती आणि युवक दोघांनीही मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले होते.

या तरूणीचे स्वतःवर कोणतेही नियंत्रण नव्हते. ती पुर्णवेळ असंबंध बडबडत होती. भररस्त्यात बराच वेळ हा प्रकार सुरू होता. येणाऱ्या जाणाऱ्या कार अडवून ही मुलगी बडबडत होती. त्यामुळे गाडीतील प्रवाशांनाही नेमके काय चालेल आहे, हे कळत नव्हते.

यामुळे तिथे उपस्थित इतरांचे मात्र मनोरंजन होत होते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, अशा पर्यटकांमुळेच गोव्याची बदनामी होत असून अशांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता गोव्यातून व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Education Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार या 5 राशींचे लोक असतात 'पुस्तकी किडे'; अभ्यासात नेहमीच मिळवतात मोठे यश

Leopard Attack: शिगावात रात्री बिबट्याची दहशत, कुत्र्यांचा पाडला फडशा; वनअधिकाऱ्यांनी केली पाहणी

Goa Education: कितीही विषय अनुतीर्ण, विद्यार्थ्यांना 5 व्या सत्रात मिळणार प्रवेश; गोवा विद्यापीठाचे परिपत्रक

Goa Assembly Live: २० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतनासह वैद्यकीय आणि प्रसूती रजेचे लाभ

Dhirio Goa: बंदी असूनही सोशल मीडियावर 'धीरयो'ची खुलेआम जाहिरात! उच्च न्यायालयाकडून दखल; कारवाईचे निर्देश

SCROLL FOR NEXT