Goa Water Supply Pipelines Dainik Gomantak
गोवा

Goa Water Supply: गोव्यात जुन्या जलवाहिन्यांमुळे वाया जाते 38 टक्के पाणी

केवळ 10 टक्केच पाईपलाईन बदलल्या, सर्व पाईपलाईन्स बदलण्यासाठी 300 कोटी खर्च

Akshay Nirmale

Goa Water Supply Pipelines: रस्ते बांधकाम किंवा ड्रेनेजच्या कामावेळी अनेक पाईपलाईन फुटत असतात. गोव्यात असे प्रकार घडलेले आहेत. यावेळी या फुटलेल्या पाईप बदलून त्याठिकाणी नवीन पीव्हीसी पाईपलाईन बसवल्या जातात.

अशा प्रकारे राज्यात आत्तापर्यंत केवळ दहा ते पंधरा टक्केच पाईपलाईन बदलण्यात आल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गोव्यात 90 टक्के जुन्या पाईपलाईन आहेत. केवळ दहा ते पंधरा टक्केच पाईप्स बदलल्या आहेत.

राज्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्सची लांबी सुमारे 1300 किलोमीटर इतकी आहे. जेव्हा या पाईपलाईन्समध्ये बिघाड होतो तेव्हा जुन्या एसी पाईपलाईन बदलून त्याठिकाणी नवीन पीव्हीसी पाईपलाईन्स बसवल्या जातात.

पाणी पुरवठा थांबवून या पाईपलाईन्स बदलणे शक्य नाही. आत्तापर्यंत सुमारे 10 ते 15 टक्के पाइपलाइन बदलण्यात आल्या आहेत.

गोव्यात जुन्या पाईपलाईन्समुळे जवळपास 38 टक्के पाणी वाया जाते, अशी माहितीही त्यांनी दिली. गोव्यातील पाणीपुरवठ्याच्या सर्व लाईन्स बदलून त्याठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज असणार आहे. या संपूर्ण कामासाठी सुमारे 300 कोटी रूपयांहून अधिक खर्च येणार आहे.

दरम्यान, हर घर जल या मिशन अंतर्गत राज्यातील घरांना 100 टक्के पाणीपुरवठा जोडणी मिळवून देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. असे असतानाही गोव्याला राज्याच्या मागणीच्या तुलनेत प्रक्रिया केलेल्या सुमारे 85 एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 28 August: जुने वाद संपतील, प्रॉपर्टी ताब्यात येईल; कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या..

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

SCROLL FOR NEXT