MLAs resign from BJP  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आणखी 'हे' 2 आमदार देणार भाजपला राजीनामा

यावेळी ते भाजपला राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजले आहे. यातच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची (BJP) सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी इतर राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे.

अशातच आता मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स आणि आमदार (MLA) विल्फ्रेड डिसा यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. फिलीप नेरी हे वेळ्ळी मतदारसंघातून 2017 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. फिलीप नेरी देखील 2017 मध्ये काँग्रेसकडून (Congress) निवडून आले होते, यावेळी ते भाजपला राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

त्यांतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कमळ या चिन्हावर निवडणुक (Election) लढवणे नेरी यांना अडचणीचे ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. राजीनामा देण्यापूर्वी ते मतदारांशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

रडून – रडून 5 किलो वजन घटले, बायको जिवंत मुडद्यासारखी झालीय; गोव्यातल्या 'त्या' नाईट कल्ब डान्सरचा पती भावूक

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Goa Live Updates: गोवा सरकारने एसआयआर (SIR) अंतर्गत 91% जनगणना केली पूर्ण

SCROLL FOR NEXT