Covid News  Dainik Gomantak
गोवा

“राज्यात 12 लाख नागरिकांनी बूस्टर डोस घेणे बाकी”

बूस्टर डोस जागृतीसाठी नेत्यांना सहभागी करून घेण्यात येणार

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्यात अद्याप 12 लाख नागरिकांनी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. असे डॉ शेखर साळकर यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.या वेळी बोलताना डॉ. साळकर म्हणाले की, बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रभावित करणाऱ्या व्यक्ती अथवा लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहे, असे ते म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्यात जवळपास 12 लाख लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्यापैकी बहुतेक बूस्टर डोससाठी पात्र आहेत. आज राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता प्रतिदिन 100 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामूळे नागरिकांनी बूस्टर डोस घेणे आवश्यक बनले आहे. या डोस घेतल्यानंतर सहा महिन्यात शरीरातील अँटी-बॉडी पातळी बूस्टर डोसद्वारे समतोल प्रमाणात राखली जाऊ शकते. त्यामूळे हो डोस घेणे आवश्यक असल्याचे डॉ. साळकर म्हणाले.

राज्यातील आजची स्थिती पाहता 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांनी अधिक प्रमाणात घेतला आहे. तसेच इतर गटातील नागरिकांनी ही जास्तीत जास्त प्रमाणात बूस्टर लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. असे डॉ. साळकर म्हणाले. तसेच जास्तीत जास्त कामगारांनी ही लोकांना केंद्रात घेऊन जा आणि डोस घ्या.”

बूस्टर डोस जागृतीसाठी नेत्यांना सहभागी करून घेणार

बूस्टर डोसबाबत जनजागृती करण्यासाठी आमदार आणि इतर प्रभावशाली नेत्यांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे साळकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, आमदार सत्ताधारी पक्षात नसले तरी त्यांनी त्यांच्या भागात जनजागृती केली पाहिजे. असे डॉ. साळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT