Wild Boar Poaching Dainik Gomantak
गोवा

Wild Boar Poaching: डुकरांच्या बेकायदा कत्तली प्रकरणी गोव्यातील ‘आंटी’सह एकाला कोठडी

या रॅकेटमध्ये कर्नाटक मधील आणखी एक व्यक्ती सहभागी असून तो अद्याप फरार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Wild Boar Poaching in Goa: पेटके-धारबांदोडा येथील एका खासगी जागेत उघड्यावर खुलेआम डुक्करांची बेकायदा कत्तल करण्याचा प्रकार काल मंगळवारी उघडकीस आला.

विशेष म्हणजे ज्या जागेत हे सर्व सुरु होतं ती जागा एका महिलेच्या नावावर असून तिला परिसरात ‘आंटी’ म्हणून ओळखले जात असल्याची माहिती वनपालांकडून देण्यात आलीय. तिच्या अखत्यारीत असलेल्या या जागेचा वापर कत्तलीसाठी करण्यात येत होता.

दरम्यान डुक्करांची शिकार करून कत्तल करणारी ही टोळी कर्नाटक, हुबळी येथील असून वन खात्याने आपल्या धडक कारवाईत बसव्वा रमेश दोड्डामणी उर्फ आंटी (65) या महिलेसह मंजुनाथ दोड्डामणी (38) या संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या रॅकेटमध्ये कर्नाटक मधील आणखी एक व्यक्ती सहभागी असून तो अद्याप फरार आहे. या आरोपीला पकडण्यासाठी गोव्याचे वन अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत.

धारवाड आणि हुबळी परिसरातील मानवी वस्तीत फिरणाऱ्या रानडुकरांना जाळ्यांचा वापर करून पकडून गोव्यात आणण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना सांगे सत्र न्यायलयात हजर केले असता त्यांची दोन दिवस रिमांडवर वन खात्याच्या कस्टडीत रवानगी करण्‍यात आली.

या प्रकणात गुंतलेल्यांच्या मागावर आम्ही असून लवकरच त्यांनाही गजाआड करण्यात येईल असा विश्‍‍वास वन खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी व्‍यक्त केला.

या प्रकरणी अशी माहिती प्राप्त होतेय की, कर्नाटकचा हुबळीहुन पाळीव डुकरांना कत्तलीसाठी गोव्यात आणले जाते. गोव्यात आणण्यासाठी अनमोड व मोले चेकनाका लागतो. या दोन्ही चेकनाक्यांवर पैसे देऊन आम्ही आमच्या गाड्या सोडवतो असा दावा या प्रकरणात समाविष्ट असलेला मंजुनाथ दोड्डामणी याने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kelbai Goddess Statue: अद्भुत! पर्येतील वाळवंटी नदीत आढळली 'केळबाय देवी'ची कदंब राजवटीतील पुरातन मूर्ती

Goa School: गोवा शिक्षण खात्याचा अजब कारभार! सरकारी शाळा दिली कर्नाटकमधील मठाला, कातुर्ली-तुयेतील प्रकार

Goa Live Updates: मडगावातील कालकोंड इमारत पाडण्यास प्रारंभ

Goa Tourism: चर्च, बीचेस हाऊसफुल! गोव्याकडे देशी पर्यटकांचा ओघ; पणजीच्या रस्त्यांवर गर्दी

Dovorlim: सरपंच निवडले, 4 तासांत अविश्वास ठराव; दवर्ली पंचायतीत सत्तानाट्य; विरोधकांचा भाजपला दणका

SCROLL FOR NEXT