Goa GI Tag
Goa GI TagDainik Gomantak

Goa GI Tag: मानकुराद आंबा, आगशी वांगी, काजूगराला मिळणार ‘जीआय’

दीपक परब : विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाचे प्रयत्न; आवाहन अहवाल सादर

Goa GI Tag भौगोलिक मूल्य आणि स्वामीत्व हक्क जपले जावेत यासाठी केंद्र सरकारच्या वतीने  केवळ त्या-त्या भागात मिळणाऱ्या प्रदेशनिष्ठ घटकांना भौगोलिक मानांकन (जीआय अर्थात जॉग्रफिकल इंडिकेशन) दिले जाते.

सुरुवातीला राज्यातल्या काजू फेणी, खोला मिरचीला हे मानांकन मिळाले. त्यानंतर  मायंडोळी  केळी, गोवन खाजे, हरमल चिलीलाही भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र मिळाले. आता मानकुराद आंबा, गोवन काजूगर, आगशी वांगी, सातशिरी भेंडी आणि बिबिंकासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी माहिती  विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभाग प्रयत्नशील आहे. यासंबंधीचे सविस्तर आवाहन अहवाल संबंधित मंत्रालयाला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जीआय मानांकन नोडल अधिकारी दीपक परब यांनी दिली आहे.

राज्याची भौगोलिकता संभाळून  ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या भौगोलिक मानांकन विभागाच्या वतीने अशा घटकांना मानांकने दिली जातात.

2009 साली काजू फेणीला हे मानांकन मिळाले.  त्यानंतर 2017 ला खोला मिरचीला हे मानांकन मिळाले तर मायंडोळी केळी, गोवन खाजे आणि हरमल चिलीला सप्टेंबर 2021 ला हे मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. 

Goa GI Tag
BSNL टॉवरसाठी मिळणार सरकारी जमीन; दुर्गम भागात नेटवर्क पोहोचवण्यासाठी लवकरच प्रकल्पाला सुरुवात

आता राज्याचे खास वैशिष्ट्य असणारा मानकुराद  आंबा, चवीला रूचकर असलेली आगशी वांगी, गोवन काजूगर, सातशिरी भेंडी आणि गोव्याचा खास गोडपदार्थ असणारा  बिबिंका यासाठी मार्च 2021 पासून प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधीचे अहवाल सादर केले आहेत, त्यामुळे हे मानांकन लवकरच मिळेल, अशी आशा आहे.

अनेक कडक निकष-

या मानांकनासाठी अनेक प्रकारचे निकष आहेत. हे निकष पूर्ण करण्यासाठी काही दिवस लागतात. ते परिपूर्ण झाल्याशिवाय भौगोलिक मानांकन दिले जात नाही.

नव्याने पाच घटकांसाठी भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ते मिळाल्यास राज्यात याचा उपयोग स्वामीत्व हक्क संरक्षण, स्थानिक घटकांना प्रोत्साहन  आणि व्यावसायिक मूल्यवर्धनासाठी होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com