Calangute Beach Fire Dainik Gomantak
गोवा

Calangute Beach Fire: कळंगुट बीचवर अग्नितांडव; मायकल लोबोंची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

या परिसरात अग्निशमन दलाचे कॉल वारंवार येतात यावर नुकसान टाळण्यासाठी त्वरित प्रतिसाद आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: कळंगुट येथील समुद्र किनाऱ्यावर पहाटे 2.45 च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शॅक जळून खाक झाले आहेत; अग्निशमन दलाने जवळील शॅक वाचविण्यात यश मिळविले; दरम्यान 70 लाखांची रु.चे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

(In Calangute Beach fire case mla michel Lobo's request to cm pramod Sawant)

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कळंगुट-बागा बीच बेल्ट परिसरात अग्निशमन दलासाठी एक किंवा दोन जलद कृतीदल पथके द्या उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. या परिसरात अग्निशमन दलाचे कॉल वारंवार येतात यावर नुकसान टाळण्यासाठी त्वरित प्रतिसाद आवश्यक आहे.

गोव्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार कळंगुट येथील समुद्र किनाऱ्यावर पहाटे 2.45 च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शॅक जळून खाक झाले आहेत. या घटनेमध्ये सुमारे 70 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत

राज्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी रावणफोंड मिलिट्री कॅम्प जवळ सकाळी एका घराला आणि खाली असलेल्या दुकानांना आग लागून सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले. ही आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. या आगीत घरासह तीन दुकाने आणि चार वाहनांची हानी झाली.

मागील महिन्यात देखील कळंगुट समुद्रकिनारी असलेल्या शॅकला आग

मागील महिन्यात देखील कळंगुट सावतावाडो येथे दुपारी समुद्रकिनारी असलेल्या शॅकला आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी पिळर्णे येथील अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले. ही घटना घडली तेव्हा पर्यटक शॅकमध्ये बसले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या आगीत 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बारमध्ये वाद, पोलिसांशी अरेरावी,डिचोलीत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; तिघांना अटक

Goa Tourism: ..ज्या चुका पूर्वी वायनाड, उत्तरकाशीने केल्या; तसेच परिणाम गोव्यालाही भोगावे लागतील का?

Goa Live News: दृष्टी जीवरक्षकांनी बागा बीचवर पारंपारिक विधींसह केली नारळी पौर्णिमा साजरी

Bison In Ponda: बोणबाग- बेतोडामध्ये भरवस्तीत गवा रेड्यांचा मोकाट वावर, परिसरात भीतीचं वातावरण Watch Video

Goa Monsoon Assembly: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामधून काय हाती लागले?

SCROLL FOR NEXT