Goa Human Trafficking: वेश्याव्यवसायासाठी महिलेची तस्करी, गुजरातमधील व्यापाऱ्याला अटक!

गोव्यात लैंगिक कारणासाठी मानवी तस्करीचे प्रमाण वाढत आहे.
Arrest
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात लैंगिक कारणासाठी मानवी तस्करीचे प्रमाण वाढत आहे. यातच पणजी मानवी तस्करीविरोधी युनिटने गुजरातमधील व्यापारी अनंत कुमारला अटक केली आहे. एका महिलेवर बलात्कार करून तिची वेश्याव्यवसायासाठी तस्करी केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली असून आरोपीला गुजरातमध्ये पकडण्यात आले आहे. त्याला गोव्यात आणण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत.

(Panaji Anti-human trafficking unit arrests businessman for allegedly raping a woman and trafficking)

Arrest
Goa Petrol Price: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले?

गोव्यात लैंगिक कारणासाठी मानवी तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. लैंगिक तस्करीची 93 टक्के प्रकरणे राज्याबाहेरील असल्यामुळे दिल्ली भेटीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

'वेश्याव्यवसायासाठी' महिलांची तस्करी गोव्यात सर्वाधिक

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2021 सालामध्ये तयार केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गोव्यात वेश्याव्यवसायासाठी महिलांची दरडोई मानवी तस्करी इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

राज्यातील लैंगिक तस्करी या विषयावर चर्चा करण्यासाठी सावंत यांनी 'अन्यायरहीत जिंदगी'चे संचालक अरुण पांडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी पांडे यांनी गोव्यातील तस्करीबाबत संशोधन अहवाल सादर केला. पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, गोवा हे लैंगिक तस्करीसाठी मुख्य गंतव्य राज्यांपैकी एक आहे. लैंगिक तस्करीशी लढा देत असताना संबंधित यंत्रणांसमोर येणाऱ्या आव्हानांबद्दलही पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com