CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

डॉ.बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केल्या महत्वपूर्ण घोषणा

राज्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची 131 जयंती उत्साहात साजरी

दैनिक गोमन्तक

गोवा: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची 131 जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमादरम्यान बोलताना आंबेडकर भवनाचे काम वर्षभरात सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगीतले. (Important announcements made by CM Pramod Sawant on the occasion of Babasaheb's Jayanti)

ते पुढे म्हणाले, मागासवर्गीयांना घरे, शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. आमचे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार पुढे जाईल. तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांसाठी लवकरच सुरक्षा भत्ता सुरू करणार असल्याचे देखील त्यांनी सांगीतले. तसेच प्रशिक्षण देऊन विविध तालुक्यांत आपदा मित्र आणि आपदा सखींची नेमणूक करणार अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केली.

राज्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची 131 जयंती उत्साहात साजरी

कुठ्ठाळी काँग्रेस (Goa Congress) गट समितीचे ओलांसिओ सिमाईश यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कुठ्ठाळी काँग्रेस गट समितीचे पीटर फर्नांडिस, अरविले दौरादो, हनुमंत, रेणुका इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ओलांसिओ सिमाईश यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले केंद्रीय कायदा मंत्री असलेले बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ज्यांनी सर्व संकटांना न जुमानता देशाला एकत्र बांधून ठेवले. आज आपण स्वातंत्र्य आणि समतेच्या बरोबरीने डोके वर काढू शकतो. आम्ही सरकारला आवाहन करतो की त्यांनी भारतीय संविधान जपावे आणि सर्व नागरिकांशी समतेने वागावे, त्यामुळे शांतता प्रबळ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

SCROLL FOR NEXT