New Education Policy Workshop Dainik Gomantakm
गोवा

New Education Policy: नवीन शिक्षण धोरणात 'पालक' महत्त्वाचा घटक! सत्तरीत कार्यशाळा, 1500 पालकांचा सहभाग

Goa Education: प्रत्येक पालकाने पालकत्वाची भूमिका समजून घेणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. आत्माराम गावकर यांनी केले.

Sameer Panditrao

वाळपई: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असून आनंददायी शिक्षणाची अंमलबजावणी करताना पालकांची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे, त्यासाठी प्रत्येक पालकाने पालकत्वाची भूमिका समजून घेणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. आत्माराम गावकर यांनी केले. 

विद्याभारती गोवा पालक व्यासपीठ आणि तालुका शिक्षणाधिकारी कार्यालय सत्तरीच्या संयुक्त विद्यमाने व पर्ये आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या सहकार्याने कदंब बसस्थानक सभागृहात आयोजित कार्यशाळेत सुमारे १५०० पालकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा. गावकर होते. यावेळी सत्तरी तालुक्याचे भाग शिक्षणाधिकारी संज्योती पावसकर, भालचंद्र भावे, शिक्षणतज्ज्ञ गणपतराव राणे, गणेश गावडे, गणेश माटणेकर आदींची उपस्थिती होती. 

प्रा. आत्माराम गावकर यांनी सांगितले की, नवीन शिक्षण धोरणात पालक हा शिक्षण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक मानला आहे. शिक्षणाच्या त्रिकोणामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे तिन्ही बाजू सक्षम असल्या पाहिजेत.

मुलांच्या शैक्षणिक आणि मानसिक विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे धोरण केवळ पुस्तकी शिक्षण पुरते मर्यादित नसून कृतीवर आधारित, आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षणावर भर देते.

कार्यशाळेची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. केरी, सत्तरीतील शिक्षकांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी पालकांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. पाहुण्यांची ओळख अजय गावडे करून दिली. प्रास्ताविक गणपतराव राणे यांनी केले. सूत्रसंचालन सरोजिनी गावकर यांनी केले. आभार प्रदर्शन दत्ताराम मयेकर यांनी केले.

भाग शिक्षणाधिकारी संज्योती पावसकर यांनी सांगितले की, सत्तरीतील मुले खूप हुशार असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती आणखी उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात. नवीन शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल आणि हे धोरण त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे ठरेल.

शिक्षण गणपतराव राणे यांनी सांगितले की, चिंतेऐवजी सहकार्याची भावना बाळगावी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी सर्वांनी हातभार लावावा. गणेश गावडे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी पालक परफॉर्मन्स इंडेक्स (PPI) सारख्या नवकल्पनांची ओळख करून दिली, ज्याद्वारे पालक आपल्या भूमिकेचा प्रभाव मोजू शकतील आणि त्यानुसार सुधारणा करू शकतील.

मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवूया, राणे

या कार्यक्रमाला आमदार डॉ. दिव्या राणे अध्यक्षस्थानी होत्या. मात्र काही कारणाने त्या उपस्थिती राहू शकल्या नाही. त्यांनी संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले परिवर्तनात्मक पाऊल आहे, जे शिक्षणात आनंद, कृतीआधारित शिकवण आणि विचार करण्याची क्षमता वाढवते. गोवा सरकारही हे धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबद्ध आहे. यामध्ये पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून तेच मुलांचे पहिले व आयुष्यभराचे शिक्षक असतात. या कार्यशाळेद्वारे पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अभ्यास करावा आणि आपल्या पालकत्वाची भूमिका समजून घ्यावी. आपण सर्वांनी मिळून आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे. चला, या प्रवासाला एकत्र सुरवात करूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT