Goa Education: गोव्यात 7 एप्रिलपासून शाळा सुरू,विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही; शिक्षण संचालकांचे स्पष्टीकरण

Goa School Reopening: या निर्णयाला अनेक पालकांकडून विरोध सुद्धा झाला मात्र शिक्षण संचालनाने शाळा सुरु करण्यासाठी एप्रिल ७ हीच तारीख पक्की केली

पणजी: गोव्यात यंदाच्या वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि म्हणूनच यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला अनेक पालकांकडून विरोध सुद्धा झाला मात्र शिक्षण संचालनाने शाळा सुरु करण्यासाठी एप्रिल ७ हीच तारीख पक्की केली असल्याची माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी माध्यमांना दिली.

एप्रिल महिन्यात शाळा सुरु केल्यास मुलांना गरमीचा त्रास सहन करावा लागेल आणि म्हणून शाळा सुरु करण्याचा हा प्रस्ताव मागे घ्यावा अशी विनंती काही पालकांनी केली होती, मात्र मुलं घरी देखील घरात बसून राहणार नाहीत, ती बाहेर जाऊन खळणाराच आहेत. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याचा काहीही त्रास होणार नाही आणि झालाच तर त्यानं ११-११:३० पर्यंत घरी सोडलं जाईल अशी माहिती शैलेश झिंगडे यांनी दिलीये.

विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील आणि यंदाचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरु केल्यास काहीच प्रश्न निर्माण न होण्याचे आश्वासन झिंगडे यांनी दिलंय. १ मे ते ३ जून पर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी सुद्धा दिली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vaibhavi IIT success story
Satya Niketan Building Collapse Delhi
Gen Z Movement India
Diocesan Society Teachers
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com