वास्को: वास्कोतील नॉन मॉन येथील संभाजी नगरचा राजा या एकवीस दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे आज थाटात वाजत गाजत दिंडीच्या तालावर विसर्जन करण्यात आले.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीत गेल्यानंतर यंदा राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम उत्साहाने सुरू झाली. अनेक ठिकाणी आकर्षक सजावट व देखावे तयार करण्यात आले होते. गेली दोन वर्षे 2020-2021 कोरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये उत्साह उमेद दिसला नव्हता. मात्र यंदा पुन्हा एकदा पूर्वीसारखा उत्साह दिसून आला. मुरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
पूर्वी घरातील गणेशोत्सवाला मोठे महत्त्व होते. तसे आता सार्वजनिक गणेशोत्सवांना देखील आले आहे. दरम्यान मुरगाव तालुक्यात विविध भागात एकूण 47 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. यात कुठ्ठाळी दाबोळी, वास्को आणि मुरगाव अशा चार मतदारसंघात मिळून एकूण 47 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे वगळता यंदा दरवर्षीप्रमाणे यंदाची गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी आणि भाविकांनी कंबर कसली व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
मुरगाव तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळापैकी काही जणांनी सात दिवस, नऊ दिवस व अकरा दिवस गणपती ठेवला तर काही मोजकेच 21 दिवसांचा सार्वजनिक गणेश पुजला. दरम्यान आज नॉन मॉन येथील संभाजी नगरचा राजा, सार्वजनिक गणेशाचे दिंडीच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत शेकडो भाविकांनी आपला सहभाग दर्शविला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.