Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात सोमवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता; तापमानाचा पारा 33.5 अंशांवर

Goa Weather Update:राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रखरखत्या उन्हाने सर्व नागरिकांसाठी पशू-पक्षी देखील हैराण झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Update

राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रखरखत्या उन्हाने सर्व नागरिकांसाठी पशू-पक्षी देखील हैराण झाले आहेत. राज्यातील कमाल तापनान ३३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मागील काही दिवसात ते ३४ अंशावर पोहोचले होते.

राज्यात सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे एप्रिलमध्ये राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

त्यासोबतच गोवा वेधशाळेने या रखरखत्या उन्हात गारवा पसरवणारी शक्यता वर्तविली आहे. राज्यात सोमवारपासून तीन दिवस म्हणजेच ८ ते १० एप्रिल या कालावधीत राज्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वाढत्या उष्म्यामुळे नागरिक पावसाची वाट पाहत आहेत. आज पणजी येथे कमाल ३३.५ अंश सेल्सिअस तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर राज्यात सकाळी ७३ तर सायंकाळी ५९ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली जी सर्वसामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ७ टक्के कमी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

Vhalshi Lake: व्हाळशी तळ्याची संरक्षक भिंत खचली, भिंतीला तडे; दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT