Goa Monsoon  Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शुक्रवारी यलो अलर्ट

Goa Rain Update: सामान्यत: राज्यातील तापमान कोरडे पाहायला मिळाले. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोठेच पावसाची नोंद झालेली नाही.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात येत्या शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला असून, या दिवशी वादळी वाऱ्यासह, वीजांचा कडकडाट आणि ३०-४० प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. उकाड्याने हैरान झालेल्या गोमंतकीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर सुरु झाल्यापासून राज्यात कोरोडे हवामान पाहायला मिळत आहे. पहाटे जाणवणारी हलकी थंडी सकाळी नऊपर्यंत गायब होते. दिवसभर मात्र गोमंतकीयांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो.

सोमवारी राजधानी पणजीत ३४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर, राज्यात २३ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवले गेले. हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पणजीतील हवेत ५९ टक्के आद्रता नोंदवण्यात आली.

गेल्या दहा दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झाली. पण, सामान्यत: राज्यातील तापमान कोरडे पाहायला मिळाले. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोठेच पावसाची नोंद झालेली नाही.

नोव्हेंबरपासून राज्यातील तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून, नागरिकांचे गर्मीने हाल होतायेत. दरम्यान, पावसाच्या शक्यतेमुळे गर्मीने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान खात्याने १२ ते १४ नोव्हेंबर या काळात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT