Goa Monsoon Update  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2024: ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशीच गोव्यात 'यलो अलर्ट'; हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2024

गोव्यात पुन्हा पावसाने जोर पकडला असून हवामान खात्याने उद्या (1 ऑक्टोबर) साठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील तुरळक ठिकाणी गडगडाट, वादळ आणि विजा चमकण्याचा इशारा देण्यात आलाय.

पुढच्या 48 तासांसाठी राज्यात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहील.

हवामानशास्त्रज्ञ आणि निवृत्त NIO शास्त्रज्ञ एमआर रमेश कुमार यांच्या मते, ऑक्टोबर 2024 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गोव्यात मान्सून माघार घेणे अपेक्षित आहे. मात्र तरीही रहिवाश्यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरडे हवामान पाहायला मिळाले. सांगेत तुरळक ठिकाणी झालेला पावासाचा शिडकावा वगळता इतर कोठेही पावसाने हजेरी लावली नाही. दरम्यान, राजधानी पणजीसह प्रमुख शहरातील तापमानाचा पारा वाढला आहे.

दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत १७३.२५ इंच (४४००.७ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी गोव्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण ४६.७ टक्के जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील 'ब्रेन ड्रेन'चे मुख्य कारण काय? LOP आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला 10 हजार नोकऱ्यांचा जाब

Comunidade Land: शेतीसाठी दिलेला भूखंड शेतीसाठीच वापरावा लागणार; कोमुनिदादीच्या भूखंडाचे आता रूपांतर अशक्य

Illegal Mining: वाळपईत दोन अवैध चिरेखाणींवर पोलिसांचा छापा

चलो बुलावा आया है...! गोव्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना दिल्लीत येण्याचे आदेश, कारण गुलदस्त्यात

Loneliness: गंभीर आजारासाठी एकाकीपणा कारणीभूत ठरतो का? नवीन रिसर्चमधून ठोस उत्तर मिळालं

SCROLL FOR NEXT