Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: केळबाय-कुर्टीत माटोळीतून साकारली कांताराची प्रतिमा

Goa Ganesh Chaturthi 2023: कर्नाटक राज्यात राने व वनांचे रक्षण करणारा म्हणून ‘कांतारा’ची ख्याती आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: केळबाय - कुर्टी येथील विशांत वसंत गावडे यांच्या घरी यंदा चतुर्थीसाठी गणपतीसमोर कांताराची प्रतिकृती असलेली माटोळी साकारण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात राने व वनांचे रक्षण करणारा म्हणून ‘कांतारा’ची ख्याती आहे.

नेमकी त्याची प्रतिकृती केळबाय - कुर्टी येथे गावडे कुटुंबीयांनी साकारली आहे. या आकर्षण ठरलेल्या कांतारा रूपी माटोळीसाठी सव्वा तीनशेपेक्षा जास्त वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. गोव्यातील विविध रानांतून तसेच घाट माथ्यावरील रानातून ही फळे व वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत.

ही माटोळी साकारण्यासाठी विशांत याच्यासोबत प्रशांत, चंद्रेश, ओंकार, आदित्य, हर्षा, करुणा, दक्ष, केयंश व इतरांचे सहकार्य लाभले आहे.

‘वन टिकवा’

खरे म्हणजे विकासाच्या नावाखाली राने आणि वने नष्ट करून आपण पुढील पिढीला काय देणार आहोत, याचा आधी विचार व्हायला हवा, म्हणूनच औषधी आणि इतर वस्तूंचा संग्रह एका माटोळीत दाखवण्यात आला आहे. अशा रान वनस्पतीपासून आपण औषध तयार करू शकतो, इतर कामासाठी या वनस्पती व फळांचा वापर होऊ शकतो, म्हणून ‘राने टिकवा’ असा संदेश या माटोळीतून दिल्याचे विशांत गावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: 15 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींवर होणार धनवर्षा, ग्रहांच्या राजकुमाराची बदलणार चाल; संपणार घरातील कटकटी

Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

इम्रान खान यांचं समर्थन करणं पडलं महागात! पाकिस्तानात 4 पत्रकारांसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; सोशल मीडिया पोस्ट ठरली गुन्हा

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT