Goa Ganesh Chaturthi 2023: राज्यात गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. १९ रोजी श्री गणरायाची घरोघरी स्थापना झाली आहे. यानिमित्ताने दैनिक ‘गोमन्तक’ आणि रूद्रेश्वर, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक अखिल गोवा घरगुती गणेश सजावट स्पर्धा २०२३ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेला प्रतिसाद वाढत असून सहभागासाठी २५ सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे.
स्पर्धेत गणेश सजावटीचे फोटो ८०१०५९५३३२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर २५ सप्टेंबर पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. गणेश उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने पूजन केले जाते. श्री गणेशाच्या या उत्साहात नेहमीप्रमाणे ‘गोमन्तक’ने आपली सामाजिक बांधिलकी जपत यंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या घरातील गणेश उत्सवात केलेली आरास तसेच पारंपरिक पर्यावरणपूरक तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटीचे दर्शन अवघ्या जगास दाखविण्याची संधी आपणास मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.