Dainik Gomantak
गोवा

Illegal Truck Business: खडी, चिरे, रेती वाहतुकीत बिगर गोमंतकीयांची घुसखोरी; ट्रकमालकांकडून पोलिसांना निवेदन

Illegal Truck Business: गोव्यात भाडेपट्टीवर राहून हे बिगर गोमंतकीय बेकायदा व्यवसाय करीत आहेत. कुठल्याही वाहतूक नियमाचे पालन केले जात नाही.

Sameer Panditrao

पेडणे: काही बिगर गोमंतकीय ट्रक व्यावसायिक बेकायदा खडी, चिरे, रेती वाहतूक करीत आहेत. या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन ट्रकमालकांनी पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांना सादर करण्यात आले. गोव्यात भाडेपट्टीवर राहून हे बिगर गोमंतकीय बेकायदा व्यवसाय करीत आहेत. कुठल्याही वाहतूक नियमाचे पालन केले जात नाही. तसेच कोणतेही शुल्क भरत नाहीत, असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.

या संघटनेने यापूर्वी वाहतूक खात्याला पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र अजून कोणतीही कारवाई झालेली नाही, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ट्रक व्यावसायिक उपस्थित होते.

याबाबत पेडणे ट्रक असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये यांनी सांगितले की, बिगर गोमंतकीय ट्रक व्यावसायिकांमुळे आमचा व्यवसाय बुडला आहे. राज्यात कायदा व्यवसाय वाढल्याने गोमंतकीय ट्रक व्यावसायिकांना फटका बसत आहे.

कारवाई करणार ; लोकरे

बेकायदा वाहतुकीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणतेही बेकायदा कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT