Karnataka to Goa Pig Transport Dainik Gomantak
गोवा

Illegal Pig Transport: कर्नाटकातून गोव्यात 53 डुकरांची बेकायदेशीर वाहतूक! अमानवीय वागणूकीचा ठपका; युवकाला दंड

Karnataka to Goa Pig Transport: न्यायाधीश पूर्वा नाईक यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२५ सह ३(५) नुसार प्राण्यांशी अमानवीय वागणूक केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : कर्नाटकातून गोव्यात विनापरवाना ५३ डुकरांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी सत्तरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जीवन शिप्री (वय २२, रा. कर्नाटक) याला २,०५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याने हा निकाल देण्यात आला.

न्यायाधीश पूर्वा नाईक यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२५ सह ३(५) नुसार प्राण्यांशी अमानवीय वागणूक केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली. ठोठावलेला दंड तीन दिवसांत भरला नाही, तर आरोपीला एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ही घटना २७ जानेवारी २०२५ रोजी केरी–सत्तरी येथील सीमा तपासणी नाक्यावर उघडकीस आली. पोलिसांनी दोन वाहने अडवली असता, एका वाहनात २३ आणि दुसऱ्या वाहनात ३० अशी एकूण ५३ जिवंत डुकरे अत्यंत अस्वच्छ व कोंदट स्थितीत वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या वाहतुकीसाठी आरोपीकडे कोणतीही वैध परवाने किंवा कागदपत्रे नव्हती.

सुनावणीदरम्यान आरोपीने पहिल्याच वेळी आपला गुन्हा मान्य केला. न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप, गांभीर्य आणि संभाव्य शिक्षेबाबत माहिती दिल्यानंतर त्याची कबुली स्वीकारून निकाल सुनावला. दंडाची रक्कम राज्य सरकारकडे जमा करण्याचे आदेश आरोपीला देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

India LPG Price Hike: जागतिक स्तरावर इंधनदराचा भडका, पण भारतात सरकारकडून दिलासा; 60 रुपयांच्या एलपीजी दरवाढीमागील खरी मेख काय?

'इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत आहेत, पण...', डोनाल्ड ट्रम्पचा मोठा धमाका; मोजतबा खामेनेईंच्या प्रकृतीबाबत केला धक्कादायक दावा

"इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍याची विकासाच्‍या बाबतीत मोठी भरारी", दामू नाईकांचे प्रतिपादन; पर्वरी उड्डाणपुलाबाबत म्हणाले की.....

SCROLL FOR NEXT