Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

Gas cylinder seizure Sancolae: सांकवाळ येथील पिकॉक व्हॅलीच्या मोकळ्या जागेत सात वाहनांसह जप्त करण्यात आलेल्या सर्व गॅस सिलिंडरची वजन व माप खात्‍याने आज तपासणी व मोजणी केली.
Gas cylinder seizure Sancolae
Gas cylinder seizure SancolaeDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सांकवाळ येथील पिकॉक व्हॅलीच्या मोकळ्या जागेत सात वाहनांसह जप्त करण्यात आलेल्या सर्व गॅस सिलिंडरची वजन व माप खात्‍याने आज तपासणी व मोजणी केली. त्‍यानंतर १०२१ सिलिंडर असल्याचे स्पष्ट झाले. त्यात ९६४ बीपीसीएलचे तर ५७ एचपीसीएलचे आहेत. ४८५ सिलिंडर रिकामे आहेत.

या प्रकरणी वजन व माप खाते आपला अहवाल वास्कोचे उपविभागीय पोलिस अधिकारी गुरुदास कदम यांना देणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल. वजन व माप खात्याच्‍या वास्को विभागाचे निरीक्षक लिलाधर कुंभारजुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को व मडगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी सिलिंडरांचे वजन केले.

नागरीपुरवठा खात्याच्या भरारी पथकाने मंगळवारी संध्‍याकाळी सांकवाळ येथे छापा टाकून दोन मोठे ट्रक, चार पिकअप व एक इतर वाहन अशी सात वाहने ताब्‍यात घेतली होती. तसेच तेथे भरलेले व रिकामे असलेले सुमारे एक हजारापेक्षा अधिक घरगुती, व्यावसायिक सिलिंडर मिळाले होते. वेर्णा पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर सदर वाहने व सिलिंडर जप्त करण्यात आले होते.

Gas cylinder seizure Sancolae
Blast in Lahore: पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का! ऑपरेशन सिंदूरनंतर 6 बॉम्बस्फोट; बलुचिस्तान आर्मीचाही हल्ला

या सिलिंडरचे आज वजन व माप खात्यातर्फे वजन करण्यात आले. त्यात बीपीसीएलचे १४.२ किलोग्रॅम वजनाचे ४४४ घरगुती तर १९ किलोग्रॅम वजनाचा एक व्यावसायिक सिलिंडर सीलबंद असल्याचे तर १९ किलोग्रॅमच्‍या १९ सिलिंडरांचे सील उघडण्यात आल्याचे आढळून आले. पाच किलो (एफटीएल) वजनाचे दोन व्यावसायिक सिलिंडर सीलबंद होते, तर ५ सिलिंडर सील उघडण्यात आले होते.

Gas cylinder seizure Sancolae
Navelim Cylinder Blast: शांतीनगर-नावेली येथे चायनीज रेस्टॉरंटमध्ये सिलिंडरचा स्फोट, आगीत लाखोंचं नुकसान

एचपीएलच्या पाच किलोग्रॅम वजनाचे (एफटीएल) १९ सिलिंडर सीलबंद तर चार सिलिंडर सील उघडण्यात आले होते. बीपीसीएलच्या १९ किलो (बीएमसीजी) वजनाच्या १२ सिलिंडरचे सील बंद होते तर १८ सिलिंडरची सील उघडण्यात आले होते. बीपीसीएल १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सहा सिलिंडरचे सील उघडण्यात आले होते. या प्रकरणी वेर्णाचे पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर, उपअधीक्षक गुरुदास कदम अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com