Illegal Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Extraction: शिवोलीतील अवैध वाळू उत्खननावर कारवाई; वाळूने भरलेले ट्रक जप्त

बार्देशचे मामलतदार प्रवीण गवस यांच्यासह खाण आणि भूविज्ञान विभागाचे अधिकारी सहभागी होते.

Kavya Powar

Illegal Sand Extraction: शिवोलीमध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाच्या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. यावेळी बार्देशचे मामलतदार प्रवीण गवस यांच्यासह खाण आणि भूविज्ञान विभागाचे अधिकारी सहभागी होते. काल (मंगळवारी) पहाटे दोन भरलेले ट्रक, एक रिकामा ट्रक आणि एक वाळू उपसण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे.

याबाबत प्रवीण गवस म्हणाले की, भागात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. याबाबत अनेक तक्रारी आल्या ज्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे आम्ही चार ठिकाणी छापे टाकले, यामधील दोन ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

दरम्यान, छाप्याची खबर मिळताच दुसऱ्या जागेवरील कामगारांनी धूम ठोकली. वाळू उपसा करणाऱ्या कामगारांनी आम्ही छापा टाकत असल्याची माहिती मिळताच वाळूने भरलेला एक ट्रक जागेवरच सोडून ते तिथून पळून गेले.

यानंतर ट्रक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला असून, संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT