Illegal Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Extraction: सेर्नाभाटीत वाळू टेकड्यांचा विद्‍ध्वंस

Illegal Sand Extraction: काम बंदीचा आदेश: प्रुडेंशीयल लँडमार्कच्या विरोधात नोटीस

दैनिक गोमन्तक

Illegal Sand Extraction: सेर्नाभाटी किनाऱ्यावर असलेल्या ‘बे वॉच’ या हॉटेल परिसरात कुंपण बांधण्यासाठी वाळूच्या टेकड्यांची कत्तल केल्याच्या घटनेची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून हे काम त्वरित बंद करण्याचा आदेश आज उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी आज सायंकाळी जारी केला.

या कत्तली संबंधी कोलवा सिव्हीक फोरमच्या निमंत्रक ज्युडिथ आल्मेदा यांनी सीआरझेड प्राधिकरण आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. हे हॉटेल चालविणाऱ्या प्रुडेंशीयल लँडमार्क प्रा. लि. कंपनीच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचे निर्देश सासष्टी मामलेदारांना दिले आहेत. यासंबंधी 24 तासात कागदपत्रे घेऊन आपल्या समोर हजर रहावे, असा आदेश जारी करण्यात आले आहे.

..सोमवारपर्यंत मुदत

सीआरझेड कायद्याचा भंग केल्यामुळे कोलवा येथील मिकीज रेस्टॉरंट पाडण्याचा निकाल दिला आहे. या आदेशानुसार हे हॉटेल त्वरित सील करावी, अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार ज्युडीथ आल्मेदा यांनी केली होती. याबाबत आपण सोमवारपर्यंत वाट पाहू, जर सोमवारपर्यंत हे हॉटेल सिल केले नाही, तर आपण वरिष्ठ अधिकारीणीकडे तक्रार करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT