morjim  Dainik Gomantak
गोवा

मोरजी येथील कथीत बेकायदा डोंगरकाप प्रकरण चिघळले

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप न केल्यास रक्तपाताची स्थानिकांना भीती

दैनिक गोमन्तक

मोरजी क्षेत्रात डोंगर माळरानावर मोठ्या प्रमाणात डोंगर कापून बेकायदा बांधकाम चालू असल्याची लेखी तक्रार मोरजी येथील मयुर शेटगावकर यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी केली होती. तक्रार करताना बेकायदा बांधकामावर आणि डोंगर कापणीवर त्वरित कारवाईची मागणी ही केली गेली होती. मोरजी येथील हे कथीत बेकायदा डोंगरकापणी प्रकरण चिघळले असुन यामुद्यावरुन स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

येथील भुखंड व्यवहारात सर्वच राजकिय पक्षांचे नेते गुंतले असल्याचं बोलल जात असुन स्थानिकांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप न केल्यास रक्तपात घडण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याबाबत काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

काय आहे मोरजी कथीत बेकायदा डोंगरकाप प्रकरण

मोरजी पंचायत क्षेत्रात डोंगर माळरानावर मोठ्या प्रमाणात डोंगर कापून बेकायदा बांधकाम चालू असल्याची लेखी तक्रार मोरजी येथील मयुर शेटगावकर यांनी मोरजी पंचायतीकडे केली होती. मोरजी पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक 245 / 8245/2424 124 / 224/4 या सर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी आणि बेकायदा बांधकाम चालू असल्याची तक्रार मयुर शेटगावकर यांनी मोरजी पंचायतीला दिलेली होती.

पंचायत क्षेत्रातील किनारी भागातील मोठया प्रमाणात जमिनी विकून संपल्यानंतर आता जमीन दलाल आणि दिल्ली व्यावसायिकांच्या नजरा डोंगर माळरानावर गेल्या असून, निसर्गाचा रहास करत मोठया प्रमाणात दिल्लीतील अनेक हॉटेल मालक, उद्योजक, चित्रपट नगरीतील व्यावसायिक, क्रिकेटपट यांनी डोंगर माळरानावरील जमिनी विकत घेतलेले आहेत.

जमिनी विकत घेऊन फार्महाउस नावाच्या खाली मोठ मोठे बंगले बेकायदापणे बांधलेले आहेत. त्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही. थेट त्यांचे हात केंद्र सरकार पर्यंत पोचल्याने केंद्र सरकारच्या सहकार्याने हे बेकायदा काम सुरू असल्याचे चित्र मोरजी पंचायत क्षेत्रातील डोंगर माळरानावर नजर मारल्यास दिसून लागल्याची चर्चा नागरिकांत दबक्या आवाजात सुरु आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT