Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलिसांची मोठी कारवाई, मध्य प्रदेशला जाणारा 13 लाखाचा दारुसाठा जप्त

गोवा बनावटीची 75.7 लिटर मद्य जप्त

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यातून मध्य प्रदेशकडे अवैधरित्या मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत संशयिताकडून सुमारे 13 लाख 35 हजार रुपयाचा दारुसाठा जप्त केला आहे. तसेच चालक वैभव यादव याला अटक करण्यात आली आहे.

( illegal Liquor stock worth 13 lakhs going to Madhya Pradesh seized at Anmod Excise Checkpost )

मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.45 वाजता वैभव यादव हा चारचाकीतून गोवा बनावटीचा 75.7 लिटर दारुसाठा चारचाकीतून घेऊन जात होता. यावेळी अनमोड तपासणी नाक्यावर अबकारी खात्याने केलेल्या कारवाईत यादवला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून एका चारचाकीसह सुमारे 13 लाख 35 हजार रुपयाचा दारुसाठा जप्त केला आहे.

याबाबत अधिक तपास सुरु आहे. मात्र मोले चेकनाक्यावरुन ही गाडी पार झालीच कशी ? या विषयी ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे. तसेच मोले तपासणी नाक्यावरुन निघताना संशयिताने आणखी काही मार्ग अवलंबला आहे का? याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SCROLL FOR NEXT