Goa Crime: हरमल येथे अमली पदार्थ प्रकरणात एकाला अटक

पेडणे पोलिसांनी केली कारवाई
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थविरोधात गोवा पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून यामूळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर आज पेडणे येथे कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

(Pernem Police arrests Ahsan Khan at Arambol for allegedly possessing drugs)

Goa Crime
Sand Mining: राज्यात अवैध व्यवसाय फोफावले; गोवा काँग्रेसचे राज्य सरकारवर टीकास्त्र

मिळालेल्या माहिती नुसार पेडणे पोलिसांना हरमल येथे एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी हरमल येथे छापा टाकत एकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 49.3 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत सुमारे 49,000 रुपये इतकी आहे.

Goa Crime
Mapusa Crime: पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

या कारवाईत छत्तीसगड येथील अहसान खान या 28 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, संशयिताने आणखी कोणत्या गुन्ह्यात सहभाग नोंदवला आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com