Baga beach illegal water sports Dainik Gomantak
गोवा

Illegal Kayaking at Baga: बागा येथे बंदी झुगारून बेकायदा 'कयाकिंग'? पर्यटकांच्या जीवाशी खेळ; यंत्रणांचा छुपा वरदहस्त असल्याचा संशय

Goa Illegal Water Sports: पर्यटकांच्या सुरक्षेला धाब्यावर बसवून बागा परिसरात सध्या बेकायदा ‘कयाकिंग’ व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: पर्यटकांच्या सुरक्षेला धाब्यावर बसवून बागा परिसरात सध्या बेकायदा ‘कयाकिंग’ व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोणतीही परवानगी नसताना हा वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असल्याने, याला स्थानिक पोलिस तसेच सरकारी यंत्रणांचा छुपा वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी याला तीव्र आक्षेप घेत संबंधित ऑपरेटरवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रातील वाढत्या धोक्यामुळे मासेमारीसह सर्व प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सवर अधिकृतपणे पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही बागा परिसरात नियम धाब्यावर बसवून हे धोकादायक खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मान्सून काळात समुद्राला उधाण आलेले असताना प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

फेरेरा म्हणाले, ‘‘पावसाळ्यात वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बंद असते; पण बागा परिसरात उघडपणे कयाकिंग सुरू आहे. याचाच अर्थ कोणीतरी कथित हप्ता घेत आहे. म्हणूनच अशा प्रकारे बेकायदेशीरपणे हे खेळ सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे.’’

ऑपरेटरवर त्वरित कारवाई करा : फेरेरा

शासकीय बंदी असतानाही पर्यटकांच्या जिवाशी खेळणारे हे बेकायदेशीर उद्योग कोणाच्याही भीतीशिवाय राजरोसपणे सुरू आहेत. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला असून प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

SCROLL FOR NEXT