Goa Monsoon: 49 दिवसांतील पावसापैकी 50 टक्‍के केवळ 8 दिवसांत, आतापर्यंत 38.93 इंचांची नोंद; तूट 37 टक्‍क्‍यांवर

Goa Monsoon Update: यंदाच्‍या मान्‍सून हंगामात १ जून ते १९ जुलै या ४९ दिवसांत पडलेल्‍या पावसापैकी ५० टक्‍के पाऊस केवळ आठ दिवसांत पडला असल्‍याचे राज्‍य हवामान खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यंदाच्‍या मान्‍सून हंगामात १ जून ते १९ जुलै या ४९ दिवसांत पडलेल्‍या पावसापैकी ५० टक्‍के पाऊस केवळ आठ दिवसांत पडला असल्‍याचे राज्‍य हवामान खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते. या ४९ दिवसांत सरासरी ६१.७९ इंच इतका पाऊस पडतो. परंतु, यंदा ३८.९३ इंच पावसाची नोंद झाली असून, सरासरीतील तूट ३७ टक्‍के इतकी आहे.

यंदा १ जून ते १९ जुलै या कालावधीत एकूण ३८.९३ इंच पाऊस पडला. त्‍यातील ५० टक्‍के म्‍हणजेच १९.६५ इंच पाऊस केवळ आठ दिवसांत पडला. त्‍यात २३ जून (३.५२ इंच), २४ जून (२.२४ इंच), २५ जून (२.२० इंच), २९ जून (२.०९ इंच), ३० जून (३.४६ इंच), १ जुलै (२.५५ इंच), ४ जुलै (१.९५ इंच) आणि १७ जुलै (१.६४ इंच) या दिवसांचा समावेश आहे. उर्वरित १९.२८ इंच पाऊस ४१ दिवसांत पडल्‍याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

Goa Monsoon
Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

दरम्‍यान, २१ जूननंतर पावसाला सुरुवात झाल्‍याने राज्‍यातील भात उत्‍पादक शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली होती. परंतु, पावसाने पुन्‍हा विश्रांती घेतल्‍याने काही भागांमधील भात लागवडीची नासाडी झाली आहे.

धारबांदोडा इंचांच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

यंदा १ जून ते १९ जुलै या काळात सर्वाधिक (५१.१३ इंच) पाऊस काणकोण केंद्रावर झाला असून, त्‍यानंतर धारबांदोडा (४९.०७ इंच) आणि सांगे (४८.६३ इंच) या दोन केंद्रांचा क्रमांक लागतो. पुढील काही दिवसांत संततधार पाऊस पडल्‍यास या दोन्‍ही केंद्रांतही पावसाच्‍या इंचांचे अर्धशतक होऊ शकते.

Goa Monsoon
Goa Dairy Consultant Appointment: कन्सल्टंट नियुक्तीखाली पैशांची उधळपट्टी; गोवा डेअरीवर दूध उत्पादकांचा आरोप

..तर तूट वाढण्याची शक्यता

राज्‍यात मान्‍सूनचा पाऊस ५ जून रोजी दाखल झाला. परंतु, त्‍यानंतर अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. अनेक दिवस राज्‍याकडे पाठ फिरवल्‍यानंतर २१ जूनपासून पावसाने जोर धरला; परंतु गेल्‍या काही दिवसांपासून पावसाच्‍या प्रमाणात घट झाली आहे. त्‍यामुळे कमी झालेली सरासरीतील तूट पुन्‍हा वाढून ती ३७ टक्‍के झाली आहे. हवामान खात्‍याने २५ जुलैपर्यंत पावसाची शक्‍यता नसल्‍याचा अंदाज वर्तविल्‍याने ही तूट आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com