Meat Shortage in Goa Dainik Gomantak
गोवा

Meat Shortage in Goa : मांसटंचाईमुळे कर्नाटकातून गोव्यात बेकायदा आयात

तस्करीप्रकरणी पोलिसांनी तीन वाहनांच्या चालकांसह पाचजणांना अटक करत 3 वाहनेही जप्त केली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Meat Shortage in Goa : राज्यात गुरांची वाहतूक करण्यास सरकारने निर्बंध घातल्यानंतर मांसचा तुटवडा भरून काढण्यासाठी गोव्यात बेकायदा आयात करण्यात येणारा मांस पुरवठा रामनगर पोलिसांनी जप्त केला. सुमारे 2220 किलो असलेल्या मांसची किंमत सुमारे 3.10 लाख रुपये आहे. या तस्करीप्रकरणी पोलिसांनी तीन वाहनांच्या चालकांसह पाचजणांना अटक करत 3 वाहनेही जप्त केली आहेत. त्यातील तिघेजण अळनावर व दोघे खानापूर येथील आहेत.

हे मांस अनमोड घाटातील रस्त्याने तीन वाहनांमधून गोव्यात आणले जात असताना रामनगर चेकनाक्यावरील पोलिस तपासणीवेळी त्याचा पर्दाफाश झाला. संशयितांनी प्राथमिक चौकशीत हे मांस गोव्यात नेण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. हा मांसचा पुरवठा गोव्यातील कोणत्या घाऊक विक्रेत्याला करण्यात येणार होता. त्याचाही तपास सुरू केला आहे. रामनगर पोलिस याप्रकरणी तपासकामासाठी गोव्यात येण्याची शक्यता आहे.

देशभर गुरांना लम्पी विषाणू लागण झाली असल्याने त्याचा फैलाव पसरू नये, म्हणून आठवड्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी शेजारील राज्यातून गोव्यात आयात होणाऱ्या गुरांच्या वाहतुकीवर बंदी घालून चेकनाक्यावर कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हा विना परवाना मांस पुरवठ्याची गोव्यात तस्करी होण्यापूर्वीच ती तीन वाहने मांससह जप्त करण्यात आली. राज्यातील मांस विक्रेत्यांकडून मोठ्या मांस पुरवठ्याची मागणी आहे. गुरांच्या आयातीवरील बंदीमुळे मांस विक्रेत्यांची समस्या वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT