Illegal Immigration News Dainik Gomantak
गोवा

Job Scam Alert: थायलंडमध्ये नोकरीचा हव्यास अंगलट; गोव्यातील 8 जणांची फसवणूक, ड्रॉप केलं दुसऱ्याच देशात

Goa Illegal Immigration News: थायलंडमध्ये नोकरीच्या शोधात गेलेल्या तरुणांना सुखरूप परत आणण्यासाठी एनआरआय आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत

Akshata Chhatre

पणजी: परदेशांमधील नोकरीच्या शोधात निघालेले आठ गोमंतकीय परिवार सध्या भयंकर परिस्थितीला तोंड देत आहेत. थायलंडमध्ये नोकरीच्या शोधात गेलेल्या तरुणांना सुखरूप परत आणण्यासाठी एनआरआय आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. गोवा एनआरआय आयोगाने दोन व्यक्तींना यशस्वीरित्या परत आणले आहे परंतु उर्वरित सहा लोकांना घरी आणण्यासाठी तातडीने काम करत आहे.

गोव्याचे एनआरआय आयुक्त ॲड. नरेंद्र सवाईकर यांनी या नोकरी घोटाळ्याच्या तपशिलांवर प्रकाश टाकला. गोव्यातील एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील काही तरुणांना थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन देऊन परदेशात घेऊन जाण्यात आले मात्र थायलंडऐवजी त्यांना दुसऱ्या देशात नेऊन सोडले. नोकऱ्या शोधणाऱ्यांचे शोषण करणाऱ्या फसव्या रिक्रुटमेंट एजंटच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

सध्या नोकरीच्या शोधात बेकायदेशीरपणे परदेशात जाणाऱ्यांची संख्येत बरीच वाढ झाली आहे. अलीकडेच पुरेसे दस्तऐवज नसल्याने अमेरिकेतून दोन गोव्याच्या युवकांना हद्दपार केल्यामुळे हा प्रकार बराच अधोरेखित झाला आहे.

नरेंद्र सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशात जाताना रिक्रूटमेंट एजंट्सच्या क्रेडेन्शियल्सची पडताळणी करणं महत्वाचं आहे. यासोबतच परदेशात नोकरी शोधणाऱ्या गोव्यातील तरुणांना मार्गदर्शन आणि समर्थनासाठी एनआरआय आयोगाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

गोव्यात बेरोजगारीचं सावट?

नीती आयोगने सादर केलेल्या अहवालानुसार गोव्यातील बेरोजगाराईचा दर हा संपूर्ण भारताच्या तुलनेत अधिक आहे. गोव्यात सध्या बेरोजगारीचा दर ८.७ टक्के आहे, जो वर्ष २०२०-२१ मध्ये १०.५ टक्के होता. हे आकडे पाहता आणि घडलेला प्रकार लक्षात घेता वेळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी सरकारला या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

गोव्यातील तरुण सध्या परदेशात नोकरी शोधण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात का घालत आहेत, याची करणं सरकारने शोधावी आणि परदेशांमध्ये गोमंतकीयांना सन्मानाने वागवलं जाईल याची पुष्टी करावी असे आवाहन केले त्यांनी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT