Goa To USA: बेरोजगारी ठरले कारण; पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी गोव्यातील तरुणाने 'डंकी स्टाईल' गाठली अमेरिका

Illegal Indian Immigrants: गोव्यातील दोन तरुणांना अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने हद्दपार करण्यात आले
Illegal Immigration
Illegal Immigration Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील दोन तरुणांना अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने हद्दपार करण्यात आले. तरुणांनी ‘डंकी’ मार्गे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेच्या लष्करी विमानातून भारतात अमृतसर मध्ये परतलेल्या ११६ भारतीयांपैकी हे दोन गोमंतकीय रहिवासी आहेत. या दोघा गोमंतकीयांना हातकड्या आणि पायात बेड्या घालून हद्दपार करण्यात आले होते आणि गोव्यातील रहिवाशांसोबत घडलेला हा पहिलाच प्रकार आहे.

यांपैकी एक म्हणजेच ए.सी. मस्करेन्हास नावाच्या युवकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत नोकरी मिळवण्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी जानेवारी महिन्यात त्याने त्याची क्रूझवरील नोकरी सोडली, या निर्णयाने त्याच्या कुटुंबाला धक्का बसला होता. अमेरिकेत कागदपत्रांच्या अभावी झालेल्या कारवाईनंतर भारतात आल्यावर, गोव्यात परत येण्यापूर्वी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या दोघांची कसून तपासणी केली होती.

गोव्यात बेरोजगारीचं सावट?

नीती आयोगने सादर केलेल्या अहवालानुसार गोव्यातील बेरोजगाराईचा दर हा संपूर्ण भारताच्या तुलनेत अधिक आहे. गोव्यात सध्या बेरोजगारीचा दर ८.७ टक्के आहे, जो वर्ष २०२०-२१ मध्ये १०.५ टक्के होता. हे आकडे पाहता आणि घडलेला प्रकार लक्षात घेता वेळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी सरकारला या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

Illegal Immigration
Illegal Indian Immigrants: अमेरिकेत अडकलेले ते दोन गोमंतकीय गोव्यात दाखल

गोव्यातील तरुण सध्या परदेशात नोकरी शोधण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात का घालत आहेत, याची करणं सरकारने शोधावी आणि परदेशांमध्ये गोमंतकीयांना सन्मानाने वागवलं जाईल याची पुष्टी करावी असे आवाहन केले त्यांनी आहे.

मदतीसाठी एनआरआय आयोगाशी संपर्क करा!

घडलेल्या प्रकरणावर गोव्याचे एनआरआय आयुक्त नरेंद्र सवाईकर यांनी गोव्यातील तरुणांच्या अमेरिकेतील प्रकरणाची पुष्टी केली आणि परदेशात जाताना सुरक्षित आणि कायदेशीर स्थलांतर पद्धतींच्या महत्वावर भर दिला. तसेच त्यांनी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांना मदतीसाठी एनआरआय आयोगाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

गोव्यातील काही लोकं क्रूझ जहाजांवर लपून किंवा त्यांच्या पर्यटक व्हिसाच्या आधारे परवानगीपेक्षा जास्त काळ राहून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. यात मदत मिळावी म्हणून अशा लोकांकडून तस्करांना बरेच पैसे दिले जातात मात्र परदेशात पकडले गेल्यानांतर याचा फटका त्यांच्या कुटुंबांना बसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com