Housie Gambling Dainik Gomantak
गोवा

Housie Gambling: केपेमध्ये म्युझिकल शोच्या नावाखाली 'हाऊजी शो', 'गोमन्तक'च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची कडक कारवाई

Illegal Housie Goa: ८ एप्रिल रोजी केपे क्रीडा संकुलावर म्‍युझिक शो करण्‍यासाठी आयोजकांनी मागितलेली परवानगी उपजिल्‍हाधिकारी कार्यालयाने नाकारली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: केपे परिसरात म्‍युझिकल शोच्‍या नावाखाली बेकायदेशीररित्‍या हाऊजी आयोजित करण्‍याच्‍या प्रकारावर दै. ‘गाेमन्‍तक’ने सलग दाेन दिवस आवाज उठविल्‍यावर शेवटी प्रशासनाने कारवाई सुरू केली.

८ एप्रिल रोजी केपे क्रीडा संकुलावर म्‍युझिक शो करण्‍यासाठी आयोजकांनी मागितलेली परवानगी उपजिल्‍हाधिकारी कार्यालयाने नाकारली. तर ५ एप्रिल रोजी केपे पालिका चौकात जो शो आयाेजित केला होता, त्‍याची परवानगी पालिकेकडून घेण्‍यासाठी आयोजकच फिरकले नाहीत.

८ एप्रिल रोजी तब्‍बल २८ लाख रुपयांची बक्षिसे असणारा ‘हाऊजी शो’ आयोजित करण्‍यात आला होता. याची जाहिरातही सगळीकडे करण्‍यात आली होती. हा शो केपे क्रीडा संकुलात होणार होता.

मात्र, ३१ मार्च रोजी म्‍युझिकल शोच्‍या नावाखाली याच संकुलात आयोजित केलेल्‍या हाऊजी शोची बातमी दै. ‘गोमन्‍तक’ने प्रसिद्ध केल्‍यानंतर क्रीडा खात्‍यानेही आयोजकांना मैदान देण्‍यास नकार दिला.

केपेचे माजी नगराध्‍यक्ष आणि विद्यमान नगरसेवक दयेश नाईक यांनीही या हाऊजींना विरोध करताना या हाऊजी म्‍हणजे एकप्रकारे जुगारच असून प्रशासनाने अशा प्रकारांना थारा देणे अयाेग्‍य अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

उद्या म्युझिकल शो; पण हाऊजींना बंदी!

केपे उद्यानात ४ एप्रिल रोजी असाच आणखी एक ‘म्‍युझिकल शो’ आयोजित करण्‍यात आला आहे. यासंदर्भात केपेच्‍या नगराध्‍यक्षा दीपाली नाईक यांच्‍याशी संपर्क साधला असता, हा ‘म्‍युझिकल शो’ आयोजित करण्‍यासाठी आमची कुठलीही हरकत नाही. मात्र या शोमध्‍ये हाऊजी आयोजित करता येणार नाहीत, अशी अट घालणारे पत्र उद्या आम्‍ही आयोजकांना पाठवू, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

POP Ganesh Idol Ban: पीओपी गणेशमूर्तींवर बंदी, पण कारवाईचे काय?

Kadamba Velankanni Bus: तामिळनाडूतील वालंकणीसाठी कदंबाच्या विशेष बसगाड्या! कुठून सुटणार गाड्या, काय असणार तारीख जाणून घ्या..

Shravan Shanivar: श्रावण शनिवारचा दुर्मिळ योग! साडेसातीचा त्रास मिटेल; अश्वत्थ मारुतीचे व्रत कसे करावे? वाचा

SCROLL FOR NEXT